भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटीसाठी जागतिक दर्जाच्या पंचांची निवड, यादीत अनेत मोठी नावे समाविष्ट
Border Gavaskar Trophy : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात मोठी जबाबदारी जागतिक दर्जाच्या पंचांवर सोपवण्यात आली आहे. बॉर्डर-गावसकर करंडक 2024 पंचांच्या नावांची यादी: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पहिली कसोटी पर्थमध्ये खेळली जाणार आहे. पाच कसोटी सामन्यांची मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे कारण यापैकी एक संघ मालिका जिंकून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. जेव्हा मालिकेचे महत्त्व इतके वाढते तेव्हा अचूक निर्णय घेण्याचा भार पंचांवरही असतो. चला तर मग जाणून घेऊया पहिल्या टेस्टमध्ये अंपायरिंगची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली आहे.
सामन्यासाठी जागतिक दर्जाच्या पंचांची टीम तयार
पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी जागतिक दर्जाच्या पंचांची टीम तयार करण्यात आली आहे. ग्राउंड अंपायरिंगची जबाबदारी अनुक्रमे इंग्लंड आणि न्यूझीलंडचे रिचर्ड केटलबरो आणि ख्रिस गफानी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अचूक निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात आणि दोघांनाही भरपूर अनुभव आहे. रिचर्ड इलिंगवर्थ पहिल्या कसोटीसाठी तिसरा पंच म्हणून जबाबदारी सांभाळणार असून तोही इंग्लंडहून आला आहे. चौथा पंच ऑस्ट्रेलियाचा सॅम नोगास्की असेल.
पर्थमधील खेळपट्टीची स्थिती
पर्थची खेळपट्टी उच्च उसळी आणि वेगासाठी ओळखली जाते, त्यामुळे पंचांना विशेषतः LBW निर्णय घेणे सोपे नसते. काही दिवसांपूर्वी खेळपट्टीचे क्युरेटर आयझॅक मॅकडोनाल्ड यांनी सांगितले होते की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी खेळपट्टीवर गवत असेल, जे पाहता चेंडू आदळल्यानंतर वेगाने बाहेर येईल याचा अंदाज लावणे कठीण नाही. त्याने असेही सांगितले की, पर्थमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमी सूर्यप्रकाश होता, त्यामुळे खेळपट्टीचा मूड थोडा बदललेला दिसतो. पण कोणत्याही परिस्थितीत येथे फलंदाजी करणे सोपे जाणार नाही.
रोहित शर्मा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना खेळणार नाही
भारताचा कर्णधार रोहित शर्मा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना खेळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाप झाल्यामुळे तो अजूनही मुंबईमध्ये आहे पण यासंदर्भात माहिती बीसीसीआयने अधिकृत माहिती दिलेली नाही. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने अद्याप अधिकृतपणे कर्णधार कोण असणार याची पुष्टी केलेली नाही, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने याची पुष्टी केली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह पर्थ कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार असेल अशी माहिती आयसीसीने दिली आहे.
हेही वाचा : पर्थ टेस्टपूर्वी भारतीय संघात देवदत्त पडिक्कलचा समावेश; टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये अनेक बदल