बिहारमध्ये व्यापारी गोपाळ खेमकांची गोळ्या झाडून हत्या
Gopal Khemka Murder Case: बिहारची राजधानी पाटणा येथी व्यापारी आणि मगध रुग्णालयाचे मालक गोपाळ खेमका यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या हाय-प्रोफाइल हत्येच्या तपासात अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या माध्यमातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी गोपाळ खेमका यांचा धाकटा मुलगा गौरव खेमका याने अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या संदर्भात बेऊर तुरुंगात बंद असलेला कुख्यात गुंड अजय वर्मा याचीही चौकशी केली आहे.
व्यापारी गोपाळ खेमका यांच्या हत्येप्रकरणी, बेऊर तुरुंगात बंद असलेला गुंड अजय वर्मा या घटनेत सहभागी असू शकतो. असा संशय आल्याने पोलिसांनी अजय वर्माची चौकशी केली. याशिवाय जमिनीच्या वादातून ही हत्या झाली असावी, असाही संशय व्यक्त केला जात आहे. तसेच कॉन्ट्रॅक्ट किलींगशीदेखील या हत्येचा संबंध आहे का, या दिशेनेही तपास केला जात आहे. या प्रकरणात गोपाळ खेमका यांचा धाकटा मुलगा गौरव खेमका याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आहे.
काल गांधी मैदान पोलिस स्टेशन परिसरातील पानस हॉटेलजवळ गोपाळ खेमका यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, ते त्यांच्या अपार्टमेंटमध्ये गाडीतून खाली उतरत होते. हल्लेखोर आधीच दबा धरून बसला होता आणि संधी मिळताच त्याने त्यांच्यावर गोळीबार केला. घटनेनंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पाटणा पोलिसांनी तपासाला अधिक गती दिली. जमिनीचा वाद आणि जुने वैमनस्य हे हत्येमागचे कारण असू शकते असा पोलिसांना संशय आहे.
‘Tanvi The Great’ला राष्ट्रीय संरक्षण अकादमीने दिले स्टँडिंग ओव्हेशन, दिग्दर्शक अनुपम खेर झाले भावुक
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर, पाटण्याचे एसएसपी कार्तिकेय शर्मा म्हणाले की, घटनेनंतर लगेचच कुटुंबीयांनी स्वतः गोपाळ खेमका यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. पोलीस प्रथम रुग्णालयात पोहोचले आणि नंतर घटनास्थळी गेले. गोपाल खेमका यांना यापूर्वी सुरक्षा देण्यात आली होती, परंतु गेल्या वर्षी त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली. खेमका कुटुंबाला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१९ मध्ये, गोपाल खेमका यांचा मोठा मुलगा गुंजन खेमका याचीही वैशाली जिल्ह्यात गुन्हेगारांनी गोळ्या घालून हत्या केली होती. आता पुन्हा एकदा खेमका कुटुंबाला लक्ष्य करण्यात आल्याने राजधानीत खळबळ उडाली आहे.
पटना येथे व्यापाऱ्या गोपाळ खेमका यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, या हत्येने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की भाजप आणि नितीश कुमार यांनी मिळून बिहारला ‘भारताची गुन्हेगारीची राजधानी‘ बनवले आहे.
आज बिहार दरोडे, गोळ्या आणि खून यांच्या सावलीत जगत आहे. येथे गुन्हेगारी ‘नवीन सामान्य‘ बनली आहे आणि सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. बिहारच्या बंधू आणि भगिनींनो, हा अन्याय आता सहन केला जाऊ शकत नाही. जे सरकार तुमच्या मुलांचे रक्षण करू शकत नाही, ते तुमच्या भविष्याची जबाबदारीही घेऊ शकत नाही. प्रत्येक खून, प्रत्येक दरोडा, प्रत्येक गोळी – ही बदलाची हाक असते. आता एका नवीन बिहारची वेळ आहे – जिथे भीती नाही, तर प्रगती आहे. यावेळी मतदान फक्त सरकार बदलण्यासाठी नाही तर बिहार वाचवण्यासाठी आहे.