औरंगाबाद : हातभट्टीच्या दारूसाठी एके काळी कृप्रसिध्द असलेल्या सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार गावात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Temple) यांचे मंदिर झाल्यापासून गावात व्यसनमुक्त गाव अभियान राबविले जात असून आजमितीला या मंदिरामुळे गावात अमुलाग्र बदल झाल्याचे दिसून येत आहे. पाहू या संदर्भातील विशेष रिपोर्ट.
[read_also content=”संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात “ट्विटर वॉर” ; राऊत म्हणाले, मिस्टर किरीट सोमय्या तुमच्याकडे ‘या’ २ प्रश्नांची उत्तरेही असतील https://www.navarashtra.com/maharashtra/twitter-war-between-sanjay-raut-and-kirit-somaiya-nrab-241276.html”]
तसे पहिले तर आपल्या गावाच्या नावाचा सन्मान कायम राहण्यासाठी अनेक जन सातत्याने चांगले काम करीत असतात. आता हेच पाहणा एके काळी हात भट्टीच्या दारू साठी पंचक्रोशीत अत्यंत कु प्रसिद्ध असलेल्या सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार गावातील हात भट्टी दारू विक्रेचे ठिकाण म्हणून हे गाव कुप्रसिध्द होते. ही प्रतिमा कायमची पुसली जावी म्हणून गावातील तरुणांनी लोकसहभागातून २०१७ साली छत्रपती शिवाजी महाराज यांचे या भव्य मंदिर उभारण्याचे ठरवत. गावात भव्य मंदिर उभारले आहे. या मंदिराच्या माध्यमातुन छत्रपती शिवरायांना अपेक्षित विचारांची जोपासना व्हावी, असा या मंदिर उभारणीमागील हेतू आहे. या मंदिरामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जळकीबाजार गावाची ओळख शिवतीर्थ अशी झाली आहे.
[read_also content=”फुटीरतावाद्यांनी सुरक्षा प्रमुखांची कार उडवली, गॅस पाइपलाइनही फुटली; काल शाळेवर रॉकेट डागण्यात आले https://www.navarashtra.com/world/battle-trailer-in-ukraine-separatists-blow-up-security-chiefs-car-gas-pipeline-explodes-a-rocket-was-fired-at-the-school-yesterday-241265.html”]
जळकी बाजार येथील स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्रातील पहिले शिवमंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या मंदिरात दररोज सकाळ संध्याकाळी विधिवत पूजा अर्चा व आरती केली जातेय. गेली पाच वर्षे या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून, त्या माध्यमातून शिवरायांचे विचार मनामनात बिंबविण्याचे कार्य सुरु झाले असून एके काळचा हातभट्टी दारूमुळे कृप्रसिध्द झालेले आपले गाव दारू मुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी मंदिराच्या माध्यमातून गावातील व्यसनी व्यक्तीचा शोध घेत व्यसन मुक्त होण्यासाठी त्याना प्रेरित केले. महापुरुषाच्या विचाराचे मंदिर रुपी हे रोपटे आजमितीला वटवृक्ष प्रमाणे मोठे झाले असून गावातील प्रत्येक व्यक्ती शिवाजी महाराजांचा विचाराने प्रेरित होऊन आपल्या राजाच्या स्वप्नातील गाव निर्माण करण्यासाठी जीवाचे रान करायला लागले आहे. व्यसनी नागरिकाचे गाव असलेली ओळख मिटविण्यासाठी युवा वर्ग पुढे येऊन व्यसनमुक्तीचा संकल्प करीत असल्याचे चित्र आता या गावात दिसून येत आहे. मंदिराच्या माध्यमातुन वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. येथे गावातील विद्यार्थ्यासाठी वाचनालय सुरु करण्यात आले आहे. स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठीही याठिकाणी पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.मंदिर समितीच्या माध्यमातुन दरवर्षी सहा मुलींचे कन्यादान करण्यात येते. शासकीय योजनांबाबत जनजागृती व्हावी,यासाठी व्यापक प्रयत्न मंदिर समितीच्या वतीने केले जातात.याशिवाय गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य वाटप ,दिनदर्शिका प्रकाशन अशा अनेक उपक्रमांचे आयोजन मंदिर समितीमार्फत केले जाते.