चीनच्या (China) वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (wuhan institute of science and technology) एका संशोधकाने दावा केला आहे की, चीनने जाणीवपूर्वक कोरोनाव्हायरस (Corona) जगभरात पसरवला आहे. कोविड-19 हे जैविक शस्त्र (Bioweapon) म्हणून वापरले गेले. जेणेकरून लोकांना संसर्ग होऊ शकतो. चीनकडून जगाविरुद्ध चालवल्या जात असलेल्या जैविक दहशतवादाचा हा भाग होता.
[read_also content=”एका रात्रीचे भाडं 50,000, क्रिकेट वर्ल्ड कपसाठी आत्तापासूनच अहमदाबादच्या हॉटेल्सचे वाढले दर! https://www.navarashtra.com/sports/ahmedabad-hotels-rates-hiked-for-cricket-world-cup-now-charges-50000-per-night-nrps-424226.html”]
संशोधक चाओ शाओ यांनी सांगितले की, त्यांच्या सहकाऱ्यांना कोरोना विषाणूचे चार स्ट्रेन देण्यात आले होते. त्यांना कोणता स्ट्रेन अधिक वेगाने पसरतो हे शोधून काढण्यास सांगण्यात आले. चाओ शाओ यांनी हा धक्कादायक खुलासा इंटरनॅशनल प्रेस असोसिएशनच्या सदस्या जेनिफर झेंग यांना दिलेल्या मुलाखतीत केला आहे. जेनिफर ही चीनमध्ये जन्मलेली एक मानवाधिकार कार्यकर्ता आणि लेखिका आहे.
या 26 मिनिटांच्या मुलाखतीत, चाओ शाओने सांगितले की, चीनने कोरोना विषाणूचा जैविक शस्त्र म्हणून वापर केला आहे. त्यांच्या वरिष्ठाने त्यांच्या सहकारी संशोधकाला कोरोनाव्हायरसचे चार स्ट्रेन कसे दिले. या चारपैकी कोणत्या स्ट्रेनमध्ये पसरण्याची क्षमता जास्त आहे, याची चाचणी करण्यास सांगितले. कोणता स्ट्रेन जास्तीत जास्त लोकांना संक्रमित करू शकतो. तो माणसांना किती आजारी बनवू शकतो हे देखील शोधण्यास सांगितलं.
Biological Terrorism: China engineered Covid-19 “bioweapon” to purposely infect people, reveals Wuhan researcher Read @ANI Story | https://t.co/OLOLUSUA7n#China #COVID19 #WuhanInstituteofVirology #BioWeapon #Pandemic pic.twitter.com/Hpfsccirw3 — ANI Digital (@ani_digital) June 28, 2023
चाओने सांगितले की, त्याचा एक साथीदार जो विषाणूशास्त्रज्ञ आहे. तो 2019 पासून बेपत्ता आहेत. त्यावेळी वुहानमध्ये मिलिटरी वर्ल्ड गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. त्याला इतर देशांतील खेळाडू राहत थांबलेल्या हॉटेलमध्ये पाठवण्यात आले होते. जेणेकरून त्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेता येईल. परंतु विषाणूशास्त्रज्ञ हे काम करत नाहीत. चाओ शाओ म्हणतात की, त्याला संशय आहे की, त्याला तिथे व्हायरस पसरवण्यासाठी पाठवण्यात आले होते.
एप्रिल 2020 मध्ये, चाओ शाओ यांना तुरुंगात उइगरा लोकांच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी शिनजियांगला पाठवण्यात आले. यासोबतच त्यांच्या पुनर्शिक्षण शिबिरांची चौकशी करण्सासही सांगण्यात आले. त्यांची प्रकृती तपासल्यानंतर त्यांची लवकरच मुक्त करणं हा त्यामागचा उद्देश होता. मात्र, व्हायरसचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना आरोग्य तपासणीचे काम देणे कुठे योग्य आहे? असं प्रश्नही त्यांना पडला. चाओ शाओ वाटते की त्याला फक्त व्हायरस पसरत आहे की नाही हे पाहण्यासाठी पाठवले गेले होते. किंवा त्याच्या मार्फत विषाणू पसवण्याची त्यांनी योजना होती. असा संशय त्याने व्यक्त केला.
दरम्यान चीनबद्दला सांगताना चाओ शाओ म्हणाले की, चीनने कोरोना बाबत जे काही केले आणि त्याने जे काही सांगितले ते एका मोठ्या योजनेचा फक्त एक छोटासा भाग आहे. या महामारीने जगभरात 70 दशलक्षाहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे याचा अद्यापही तपास सुरू आहे. शास्त्रज्ञ औषधे आणि लस शोधत आहेत. यावर कायमस्वरूपी उपाय शोधत आहेत.