पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या लसीकरणाचे प्रमाण वाढावे यासाठी आज शनिवार, 9 ऑक्टोबरला केवळ महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मुंबईतील विविध केंद्रांमध्ये सकाळी 10.30 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत हे लसीकरण सुरू राहणार असून महिलांना पहिला आणि दुसरा डोस घेता येणार आहे. दरम्यान, या विशेष लसीकरणामुळे उद्या ऑनलाइन नोंदणी बंद राहणार आहे.
कोरोनाला थोपवायचे असेल तर लसीकरणाची मोहीम युद्ध पातळीवर राबवणे गरजेचे आहे. याच कारणामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिका वेगवगेळ्या मोहिमा राबवत आहे. आज जास्तीतजास्त महिनांना लस उपलब्ध व्हावी त्यासाठी मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-19 लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवले जात आहे.
#CoronavirusUpdates
८ ऑक्टोबर, संध्या. ६:०० वाजता २४ तासात बाधित रुग्ण-५३२ २४ तासात बरे झालेले रुग्ण-२८७ बरे झालेले एकूण रुग्ण-७२३१०८
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९७% एकूण सक्रिय रुग्ण-५०१७ दुप्पटीचा दर-११२३ दिवस
कोविड वाढीचा दर (१ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर)-०.०६%#NaToCorona — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 8, 2021
आतापर्यंत मुंबईत 85 टक्के जणांनी पहिला तर 45 टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. आज महिलांसाठी होणारं हे तिसरं विशेष लसीकरण आहे.
कोविड-19 विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध घटकांकरिता विशेष सत्र राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र होणार आहे. या राखीव सत्राचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.






