फोटो सौजन्य- pinterest
आजचा दिवस चढ उताराचा राहील. आज जानेवारी महिन्याचा शेवटचा दिवस आहे. अंक 4 चा स्वामी ग्रह राहू आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर राहूचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. आज शनिवारचा दिवस असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शनि आहे आणि शनिचा अंक 8 आहे. आज मूलांक 4 असलेले लोक नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात आणि मूलांक 8 असलेल्या लोकांना नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. एखाद्या गोष्टीवरून कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण राहू शकते. संयम बाळगा. आरोग्याची काळजी घेण्यासाठी गरज आहे.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कोणत्याही व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. अन्यथा समस्या वाढू शकतात. व्यवसायात कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या. तुम्ही काही गोष्टींचे दान करू शकता.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला आज खूप मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. आर्थिक बाबतीत कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यापासून सावध राहा. न्यायालयीन प्रकरणामध्ये सावध राहावे. आरोग्याची काळजी घ्यावी.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी बदल करण्याचा विचार करू शकता. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ व्यक्तीसोबतताण जाणवू शकतो. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. आर्थिक व्यवहार सावधगिरीने करा.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुमची नियोजित कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. जुने मित्र भेटू शकतात. धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यावसायामनिमित परदेशात जाऊ शकता.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी नवीन मित्र भेटतील. तुम्ही धार्मिक ठिकाणी जाऊ शकता. विवाहाच्या संबंधित चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा समस्या जाणवू शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी. वाहन चालवताना काळजी घ्यावी. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. जमीन मालमत्तेची खरेदी करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल राहील. व्यवसायात नवीन लोकांची ओळख होईल. घराच्या संबंधित आजचा दिवस अनुकूल राहील. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहे त्यांना यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






