अलीकडे काही दिवसात देशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे (India Corona Update) देशाची चिंता वाढत असताना गेल्या 24 तासांत देशातील कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट पाहयला मिळाली. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या नव्या 3,325 रुग्णांची नोंद करण्यात आली. सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 44,175 वर गेली आहे. तर गेल्या 24 तासात 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असुन देशातील एकूण मृतांची संख्या वाढून 5,31,564 झाली आहे.
#COVID19 | India reports 3,325 new cases and 6,379 recoveries in the last 24 hours; the active caseload stands at 44,175. (Representative image) pic.twitter.com/gxC6P9rtuH — ANI (@ANI) May 2, 2023
गेल्या 24 तासात देशात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या 5,31,564 वर गेली आहे, ज्यामध्ये केरळमधील सर्वाधिक मृत्यूचा समावेश आहे. गेल्या 24 तासात केरळमधे सात जणांचा मृत्यू झाला आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटवर शेअर केलेल्या डेटानुसार, राष्ट्रीय कोविड पॅझिटिव्हीटी रेट 98.71 टक्के नोंदवला गेला आहे. आतापर्यंत कोरोनातुन बरे झालेल्या लोकांची संख्या 4,43,77,257 झाली आहे, तर मृत्यू दर 1.18 टक्के आहे.
[read_also content=”कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर; बेरोजगार, सामन्य वर्गाला देणार ‘या’ सवलती https://www.navarashtra.com/india/congress-manifesto-announced-for-karnataka-assembly-elections-concessions-will-be-given-to-the-unemployed-common-people-nrps-393971/”]
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 92.67 कोटी कोविड चाचण्या घेण्यात आल्या असून, गेल्या 24 तासांत 87,038 चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर, देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत कोविड लसीचे एकूण 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.