कल्याण : विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला सर्व पक्ष लागले आहेत, अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते हे पक्ष अदलाबदली मध्ये व्यस्त आहेत. लोकसभा निवडणूकीनंतर आत्ता विधानसभेची तयारी सुरु झाली आहे. कल्याण पश्चिम विधानसभेत महाविकास आघाडीमध्ये अनेक लोक इच्छूक आहेत. एकीकडे ठाकरे गटामध्ये उमेदवारीसाठी शर्यत सुरु आहे तर दुसरीकडे शिंदे गटामध्ये सुद्धा रस्सीखेच सुरु आहे. कल्याणधील शिवसेना नगरसेविकेचे पती साईनाथ तारे यांचा उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पक्ष प्रवेश हाेणार आहे. त्यांच्या प्रवेशापूर्वीच ठाकरे गटात वादाला सुरंग फुटल्याचे दिसून येत आहे. युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर यांनी उद्धव ठाकरे यांचा एक पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी एका ठरावासंदर्भात संदर्भात लिहिले आहे.
कल्याणमध्ये शिंदे गटाचा कार्यकर्ते साईनाथ तारे यांचा ठाकरे गटात प्रवेशावरुन वाद सुरु झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटातील युवा सेनेच्या जिल्हा प्रमुखांनी एक बैठक घेऊन ठराव मंजूर केला आहे की, तारे यांना पक्षात प्रवेश देऊ नये. दिला तर एक वर्षाकरीता त्यांना पद देऊ नये. तसेच त्यांचा उमेदवारी देऊ नये, असा ठराव पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविला आहे.
अल्पेश भोईर यांच्या या पत्रात लिहिले आहे की, साईनाथ तारे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. लोकसभा निवडणूकीत आपल्या पक्षाचे बूथ लावू दिले नाही. अशा व्यक्तिला पक्षात घेतल्यास निष्ठावंतावर अन्याय होईल. अशा व्यक्तीला घेतले तर एक वर्ष त्याला कोणतेही पद दिले जाऊ नये. तसेच निवडणुकीमध्ये उमेदारीचा विचार होऊ नये. राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेना नेते साळवी यांचया नेतत्वात तारे यांचा प्रवेश आहे. या बाबत साईनाथ तारे यांच्या यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, काही लोक नाराज असतील त्यांच्यासोबत चर्चा करुन त्यांचा गैरसमज दूर करणार आहे. मी शिंदे गटात होतो, आत्ता माझा पक्ष प्रवेश ठाकरे गटात होणार आहे. कल्याणमध्ये येऊन मी प्रतिक्रिया देणार आहे.