फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात अनेक अशा विदेशी ऑटो कंपन्या आहेत, ज्या त्यांच्या कार्सचे उत्पादन भारतात करत असतात. पुढे या कार्स विदेशात सुद्धा निर्यात होतात, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था कणखर बनते. अशाच एका मेड इन इंडिया एसयूव्हीला विदेशातून दमदार मागणी मिळत आहे. ही एसयूव्ही म्हणजे Maruti Suzuki Jimny.
मारुती सुझुकी जिम्नी ही विदेशात एक लोकप्रिय एसयूव्ही ठरली आहे. ही कार भारतीय बाजारपेठेत विक्रीच्या तुलनेने मर्यादित असली तरी, परदेशी बाजारपेठेतही तिला मोठी मागणी मिळत आहे. मारुतीने अलीकडेच जाहीर केले की ते त्यांच्या Jimny 5-डोअर एसयूव्हीचे एक लाख युनिट्स निर्यात करण्याचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीने 2023 मध्ये या कारची निर्यात सुरू झाली आणि आता ती 100 हून अधिक परदेशी बाजारपेठांमध्ये विकली जाते.
अक्षरशः ‘या’ बाईक चालवून चालवून थकाल पण पेट्रोल नाही संपणार! 100 किमीचा मायलेज आणि किंमत…
Jimny 5-door चा प्रवास भारतात जून 2023 मध्ये सुरू झाला, जेव्हा ही एसयूव्ही Auto Expo 2023 दरम्यान प्रथमच सादर करण्यात आली होती. लाँचपूर्वीच या SUV ची बुकिंग 30,000 पेक्षा जास्त झाली होती, परंतु देशांतर्गत बाजारात तिची विक्री अपेक्षेइतकी ठरली नाही. तरीदेखील, एक्स्पोर्ट बाजारपेठांमध्ये Jimny ला प्रचंड यश मिळाले.
ऑक्टोबर 2023 पासून निर्यात सुरू झाल्यानंतर, Jimny ने मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, साउथ आफ्रिका, चिली आणि जपान यांसारख्या बाजारांमध्ये झपाट्याने लोकप्रियता मिळवली. विशेष म्हणजे जानेवारी 2025 मध्ये जेव्हा ती जपानमध्ये ‘Jimny Nomade’ या नावाने लाँच करण्यात आली, तेव्हा केवळ चार दिवसांत 50,000 पेक्षा जास्त ऑर्डर्स मिळाल्या आणि त्यामुळे कंपनीला बुकिंग तात्पुरती थांबवावी लागली.
भारतीय पाऊल पडते पुढे! Japan च्या Auto Expo मध्ये Maruti च्या ‘या’ Made In India कार होणार सादर
Maruti Suzuki, जी भारतातील नंबर-1 निर्यातदार कंपनी आहे, सध्या 17 मॉडेल्सचे निर्यात करते, ज्यामध्ये Baleno, Swift आणि Dzire यांसारख्या लोकप्रिय कार्सचा समावेश आहे. कंपनी सलग चार आर्थिक वर्षांपासून भारतातील सर्वात मोठी पॅसेंजर वाहन निर्यातदार ठरली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कंपनीने 3.3 लाखांहून अधिक वाहने निर्यात केली, ज्यात 17.5% वाढ नोंदवली गेली. भविष्यात Maruti आपले हायब्रिड आणि EV व्हेरिएंट्सवर काम करत असून, हे निर्यात वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.