जैन समाजाच्या ट्रस्ट घोटाळ्याचे धागेदोरे नागपूरपर्यंत, सगळं लवकर बाहेर काढणार? संजय राऊतांचा इशारा
Sanjay Raut PC:“पुण्यात जैन समाजाच्या ट्रस्टच्या साडेचार हजार कोटी जागेचे जे प्रकरण समोर आले आहे ते कोण लोक आहेत? ते सगळे बाहेरचे लोक आहेत. साडेतीन ते चार हजार कोटींचा घोटाळा आणि त्याचे धागे मुख्यमंत्री आणि नागपूर पर्यंत गेले आहेत. हे लवकरच मी बाहेर काढेल. जैन समाज रस्त्यावर उतरला आहे. एका ट्रस्टच्या भूखंडाचा घोटाळा हा किती गंभीर आहे. तुम्हाला लवकरच कळेल यात कोण कोण अडकलं आहे, किती केंद्रीय मंत्री आहेत, किती महाराष्ट्रातले आहेत, मुख्यमंत्री यांच्या मामांपर्यंत कसं प्रकरण गेलेलं आहे. हे लवकरच कळणार आहे. ” असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. आज सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.
IMD Weather: दिल्लीत वाढत्या थंडीसह खराब होतेय हवा, आनंद विहारमध्ये 350 च्या पार पोहचला AQI
संजय राऊत म्हणाले, “24 तासांत तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी कसे निर्णय देतात, जे सामान्य माणसाला मिळत नाही. बघू ना आपण, या सगळ्या गोष्टी येतील. तुम्ही भ्रष्टाचाराच्या चिखलात डुबक्या मारतायत आणि आम्हाला ज्ञान देता. मिस्टर फडणवीस हे राजकारण करताना तुम्ही देखील जपून करा. तुमच्या आधीपासून आम्ही राजकारण आणि महाराष्ट्राच्या रस्त्यावर आहोत. आयतं नाही मिळालं आम्हाला, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे.
“काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आणि त्यांचे बंधू राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सांगितलं आहे की, आम्ही एकत्र राहण्यासाठी आलो आहोत. हे तुम्ही तुमच्या डोक्यात कार्यक्रम पक्का करा, आम्ही एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत. हे जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सांगतात तेव्हा ते पुन्हा एकत्र आले ते पुन्हा एकत्र आले. हे बोलणं योग्य नाही.” अशी प्रतिक्रीया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
काल शिवतीर्थावर दीपोत्सव झाला तो दीपोत्सव गेले 14 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खास करून राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून होत आहे. ते मुंबईचे आकर्षण आहे, काल त्याचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी जनतेला अभिवादन केलं आणि मराठी ऐक्याचा हा दीपोत्सव आहे असेही सांगितले, आनंदोत्सव आहे.
अशा असंख्य दिवाळी किंवा दीपोत्सव मराठी माणसाच्या जीवनात येवो ही मराठी माणसाची भावना आहे. काल ज्या प्रकारे दीपोत्सव आणि आतिषबाजी आकाशात झाली. हा अशा प्रकारचा दीपोत्सव मराठी आणि महाराष्ट्राच्या जीवनामध्ये दीर्घकाळ राहू दे ही आमची सगळ्यांची भावना आहे आणि त्याला सुरुवात झाली आहे
कालचे वातावरण अत्यंत उत्साही आणि आनंदी होतं. हा आनंद संपूर्ण दिवाळी मध्येच राहील आणि यापुढेही राहील. यापुढे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या प्रत्येक प्रश्नात आणि संघर्षात राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्रितपणे काम करतील. मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला वैभवाचे दिवस प्राप्त करून देतील. हा या दिपोत्सवाचा संदेश आहे. यापेक्षा काय हवं आहे? उत्तम चाललं आहे, उत्तम चालू द्या. तुम्ही सगळ्या मराठी माणसाने शुभेच्छा दिल्या पाहिजे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे काय, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, का ते मराठी नाहीत का?, असा प्रतिप्रश्न संजय राऊतांनी केला. संजय राऊत म्हणाले, शरद पवार हे सुद्धाआमच्या महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. आज पुन्हा एकदा या महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रावर जे आक्रमण सुरू आहे एका विशिष्ट वर्गाकडून,उद्योगपतीकडून मुंबई गिळण्यासाठी, ते पाहता प्रत्येक मराठी नेत्याची जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाने पाळली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस मधले महाराष्ट्रातले पुढारी या लढाईत कुठेच मागे राहणार नाहीत. या लढाईमध्ये फक्त महानगरपालिका जागावाटप हा प्रश्न नाही. मतदार यादीतला जो घोटाळा आहे हा सुद्धा महाराष्ट्र आणि मराठी माणसाची पिछेहाट करण्यासाठी भाजप आणि त्यांच्या लोकांनी केला आहे.
आम्ही एकत्र आलो ना आम्ही. एकत्र आलो, आवाज उठवला, आम्ही त्याच्यावर संघर्ष करायला तयार आहोत, रस्त्यावर उतरायला तयार आहोत, ही भावना सगळ्यांची असताना या पक्षाचं काय होणार? त्या पक्षाचं काय होणार? यापैकी एकाही पक्षाने कधीही एकत्र येण्याबद्दल कोणतीही नकारात्मक भूमिका घेतलेली नाही. बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड असे नेते आमच्या निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळात उपस्थित राहिले. स्वतः शरद पवार होते, दुसऱ्या दिवशी जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे होते. असंही संजय राऊतांनी नमुद केलं.
Exclusive: ‘कमळी ही मोठी जबाबदारी, मेहनत करून प्रेक्षकांना जिंकायचंय’ – विजया बाबर
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात, मनसेला सोबत घेण्याबाबत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, मनसेला सोबत घेण्याबाबतचा हा प्रस्ताव अजू कुठे दिलेलाच नाही. अशा प्रकारचा प्रस्ताव जो असतो हा त्यांचा प्रश्न आहे इतर कोणाचा प्रश्न नाही. त्यांचा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांची वर्किंग कमिटी असते, त्यांची स्क्रीनिंग कमिटी असते, त्यांची स्टेट कमिटी असते, मग त्यांची स्टेट कमिटीची वर्किंग कमिटी असते. अशा प्रकारचा हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आमच्याकडे तसं नाही किंवा राज ठाकरे यांच्याकडे तसं नाही, उद्धव ठाकरे यांच्याकडे तसं नाही, शरद पवार यांच्याकडे देखील तसं नाही. आम्ही आला निर्णय घेतला गेलो पुढे. तो खूप मोठा पक्ष आहे. स्वातंत्र्य चळवळीतला पक्ष आहे आणि त्याचं काळात वावरात आहे.
आशिष शेलारांनी केलेल्या टिकेवर बोलताना संजय राऊतांनी त्यांचाही समाचार घेतला. आशिष शेलारांना सांगा राज ठाकरे यांच्याकडे चहा प्यायला जाऊ नका, नाटक करायला जाऊ नका. दोघांचेही रंग पक्के आहेत. ठाकरे यांचा रंग खरडून काढण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, ते पक्के रंग आहेत. भारतीय जनता पक्षाचा रंग राहिला आहे का? भारतीय जनता पक्षाचा रंग हा भ्रष्टाचाराचा रंग आहे, काँग्रेसचा रंग आहे. भारतीय जनता पक्षात 90% काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आहे की नाही हे शेलार यांनी सांगावं. असा खोचक सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.
संजय राऊत महणाले, भारतीय जनता पक्षात स्वतःचं नेतृत्व राहिलं आहे का? मला आचार्य वाटतं हे सगळे काँग्रेस आणि एनसीपी मधून आलेले लोक म्हणतात हे भाजपचे नेते आहेत. कालपर्यंत आमच्या छत्राखाली होते. शिवाजीराव कर्डिले काल वारले. भाजपचे नेते यांचे निधन, कसं काय? आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही काळ शिवसेनेमध्ये होते. 90% लोक भारतीय जनता पक्षामधले काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेमध्ये आहेत. स्वतःच काय आहे त्यांचं? स्वत:ची पोरं जन्माला घालावी, दुसऱ्यांच्या पोरांला किती वेळ खेळवणार तुम्ही? पाळणे तेवढेच आहेत, पोरं वाढत चालली आहेत, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगानिस्तानचे क्रिकेटपटू मारले गेले, यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत यापुढे क्रिकेट खेळणार नसल्याचा दावा केला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, भारत त्यांच्याबरोबर केक देखील खाऊ शकतो. भारत क्रिकेट पण खेळू शकतो. कारण अफगाणिस्तानमध्ये जय शाह नाहीत. अफगाणिस्तान मध्ये अमित शाहा आणि जय शाह नसल्यामुळे अफगाणिस्तान हा प्रखर राष्ट्रवादी निर्णय घेऊ शकला. आमच्याकडे जय शाह आहेत. त्यांच्याकडे पैसे आहेत, पैशाचे व्यवहार आहेत, अफगाणिस्तान मध्ये पैशाचे व्यवहार चालत नाहीत राष्ट्र आणि धर्मापुढे. जय शाह तिकडे असते तर कदाचित हा निर्णय झाला नसता.”
महाविकास आघाडी मतभेद आहेत. भविष्यात मनसे आणि ठाकरे गटात झालेल्या मतभेदांबाबत विचारले असता, संजय राऊत म्हणाले, ”इथे महाविकास आघाडीचा प्रश्न येत नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. ज्यांना आमच्यासोबत यायचं आहे आम्ही त्यांचे स्वागत करणार. ही युती पक्की आहे. महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी, इंडिया ब्लॉक लोकसभेसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अशा प्रकारचे कोणतेही चर्चा कोणामध्ये झाली नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे या क्षणी एकत्र आहेत. मुंबई आणि मराठी माणूस वाचवण्यासाठी आणि हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे.