फोटो सौजन्य: iStock
नवी दिल्ली: महासागरात निर्माण झालेले चक्रीवादळ हेलेन ने अमेरिकेत हाहाकार उडवला आहे. आता हे वादळ फ्लोरिडाच्या दिशेने सरकत असून आणखी शक्तीशाली होत आहे. नॅशनल हरिकेन अलर्टनुसार, हेलेन कॅटेगरी-4 च्या या चक्रीवादळामुळे अमेरिकेतील 15 राज्ये पुरात बुडाली असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच या वादळामुळे महासागरात 10 ते 20 फूट उंचीच्या लाटा तयार होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणवर विनाश होत आहे. तर या वादळामुळे आणखी दोन वादळे बळकट होण्यास सुरूवात झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अटलांटिक महासागरात, जॉयस आणि आयझॅक चक्रीवादळ तयार होत आहे. जे हेलेन वादळापेक्षा आणखी शक्तिशाली असण्याची शक्यता वर्तवली नॅशनल हरिकेनने वर्तवली आहे. अटलांटिक महासागरात कॅटेगरि 1 आयझॅक चक्रीवादळामुळे, अझोरेसमध्ये समुद्राच्या लाटा धोकादायक बनत आहेत. हे वादळ अझोरेसच्या पश्चिमेला सुमारे 1080 मैलांवर असून 75 मैल प्रतितासाने वाहत आहे. सध्या हे वादळ 18 mph वेगाने पूर्व-ईशान्य दिशेला सरकत आहे. आयझॅक चक्रीवादळ आठवड्याच्या अखेरीस अधिक मजबूत होऊ शकते, असे पूर्वानुमानकर्त्यांनी सांगितले आहे.
This morning, @NOAA‘s #GOESEast 🛰️ is closely tracking newly-formed Tropical Storm #Isaac in the Atlantic, Hurricane #Helene in the Gulf, and Hurricane #John in the eastern Pacific. A disturbance near western Africa also has a high chance of becoming a cyclone.
Stay updated:… pic.twitter.com/8BCYBJ3pPW
— NOAA Satellites (@NOAASatellites) September 26, 2024
वादळ कमजोर होण्याआधीच हाहाकार माजवत आहे
याशिवाय, हरिकेन वादळ उत्तरेकडे लीवर्ड बेटांच्या पूर्वेस वाहत असून 1325 मैलांवर 40 मैल प्रतितास वेगाने पुढे सरकत आहे. तर 13 मैल वेगाने बेटाच्या वायव्येकडे सरकत आहे. जॉयस वादळ हळूहळू मजबूत होण्याची शक्यता असून ते काही दिवसांतच कमकुवत होतील असे हवामान विभागाने वर्तवले आहे. मियामीस्थित यूएस नॅशनल हरिकेन सेंटरच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही वादळांबाबत कोणताही इशारा नाही, परंतु आयझॅक वादळामुळे येणाऱ्या लाटा अझोरेमध्ये नुकसान करू शकतात. तसेच हेलेन चक्रीवादळाने कमकुवत होण्यापूर्वी उत्तर-पश्चिम फ्लोरिडामध्ये प्रचंड विध्वंस केला आहे. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
Second, more powerful surge now impacting Clearwater Beach. #flwx #hurricane #helene pic.twitter.com/eqLzVp2HeM
— Warren Faidley – The Cyclone Cowboy (@Stormchaser) September 27, 2024
हेलन चक्रीवादळामुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात नुकसान
शुक्रवारी रात्री हेलन चक्रीवादळ अमेरिकेच्या 15 राज्यांच्या किनारपट्टीवर जोरात धडकले. यामुळे राज्यांमध्ये ताशी 150 ते 200 किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले आणि लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. सुमारे दीड कोटी लोकांना स्थलांतर करण्यास भाग पाडले आहे. फ्लोरिडा, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, साउथ कॅरोलिना, व्हर्जिनिया, अलाबामा येथे सर्वाधिक विध्वंस झाला आहे. जो बिडेन सरकारने या राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. वादळामुळे आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. हेलन चक्रीवादळामुळे किमान 35 लाख घरांतील 1.20 कोटी लोक प्रभावित झाले आहेत.