फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
India vs New Zealand 3rd ODI Toss Update : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना इंदौरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मागील सामन्यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाने या मालिकेमध्ये बरोबरी केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली आज एकत्र खेळताना दिसणार आहेत.
आजच्या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे, यामध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतामध्ये ठंडिचे वातावरण असल्यामुळे संध्याकाळी गोलंदाजी करण्यासाठी कठिण होते. आजचा सामना जो संघ विजयी होणार आहे तो संघ मालिकेचे जेतेपद नावावर करेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील रेकाॅर्ड पाहिले तर न्यूझीलंडचा संघ आतापर्यत भारतामध्ये एकही मालिका जिंकलेली नाही.
🚨 Toss Update 🚨 #TeamIndia win the toss in the decider and elect to bowl first. Updates ▶️ https://t.co/KR2ertVUf5#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/2VBlbox60u — BCCI (@BCCI) January 18, 2026
भारताच्या संघाने या तिसऱ्या सामन्यामध्ये एक महत्वाचा बदल केला आहे. आजच्या सामन्यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला संघामध्ये स्थान मिळाले आहे. प्रसिद्ध कृष्णा याला बाहेर केले आहे आणि अर्शदीप आज संघाचा भाग असणार आहे. आगामी विश्वचषकामध्ये अर्शदीप सिंह खेळताना दिसणार आहे. ही मालिका झाल्यानंतर भारताचा संघ आगामी 10 दिवस पाच टी20 सामने खेळताना दिसणार आहे.
शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, रवींद्र जडेजा, आयुष बडोनी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, हर्षित राणा.
मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, ग्लेन फिलिप, मिचेल हे, जोश क्लार्कसन, जॅक फॉल्क्स, डॅरिल मिचेल, ख्रिश्चन क्लार्क, काइल जेमिसन, जेडेन लेनोक्स, मायकेल रे.






