गणेशोत्सव आला अवघ्या एका दिवसावर आला आहे. गणेशाचे लवकरच आपल्या मायानगरीत आगमन होत असून अनेक लोक आता गणेशाच्या आगमनाची आस लावून बसले आहेत. असे म्हणतात की, तुमच्या मनात खरी श्रद्धा असेल तर तुम्हाला सृष्टीच्या कणाकणात देवाचे दर्शन घडते. भारतात गणेशाची अनेक खास आणि सुंदर मंदिर आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का? फक्त भारताचं नाही तर संपूर्ण परदेशातही गणेशाची अनेक भव्य मंदिर आहेत. म्हणजेच गणेशाचा महिमा फक्त भारतात नाही तर जगभरात पसरलेला आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही देशांविषयी सांगणार आहोत, जिथे गणेशाची भव्य मंदिर उभारण्यात आली आहेत.
श्रीलंकेतदेखील गणेशाची पूजा केली जाते. इथे श्रीगणेशाची पिल्लियार म्हणून पूजा केली जाते. येथे गणेशाची अनेक प्रसिद्ध मंदिर आहेत. अरियालाई सिद्धिविनायककर मंदिर आणि कटारगामा मंदिर हे दोन मंदिर गणेशाच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहेत.
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024 : भारतातील प्राचीन रहस्यमयी गणेश मंदिरं, फार कमी लोकांना माहिती आहेत, एकदा नक्की भेट द्या
हुआई क्वांग स्क्वेअर हे थायलंडमधील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात गणेशाची रोज पूजा केली जाते. इथे गणेशाची अनेक मंदिर आहेत त्यातीलच एक मंदिर चियांग माई येथे आहे. हे मंदिर चांदीचे मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात चांदीची गणपतीची मूर्ती बसवण्यात आली आहे.
सूर्यविनायक मंदिर हे नेपाळच्या भक्तपूर जिल्ह्यात स्थित एक हिंदू मंदिर आहे. काठमांडूपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर हे मंदिर जंगलात असून तेथे पायी जाण्यासाठी एक मार्ग आहे. दूरदूरवरून लोक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. हे काठमांडू खोऱ्यातील गणपतीच्या लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे.
हेदेखील वाचा – Travel: जिथे मुघलांच्या कुऱ्हाडीचा घावदेखील निरर्थक ठरला असे भारतातील राधाकृष्णाचे चमत्कारी मंदिर, 300 वर्षे जुना इतिहास
नेदरलँडमधील डेन हेल्डरमधील श्री वरथराजा सेल्वविनायगर मंदिर हे देशातील सर्वात जुने गणेश मंदिर आहे. हे मंदिर 1991 मध्ये श्रीलंकेतून आलेल्या तमिळ लोकांनी बांधले होते. या मंदिरात भाविक दूरदूरवरून दर्शनासाठी येत असतात.