मुंबई : आज राज्यात ४०,९५६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५१,७९,९२९ झाली आहे. आज ७१,९६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ४५,४१,३९१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.६७% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ५,५८,९९६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान राज्यात आज ७९३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ७९३ मृत्यूंपैकी ४०३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २२० मृत्यू, नाशिक- ४७, नागपूर- ३४, बीड- २२, नांदेड- २२, पुणे- १७, ठाणे- १४, लातूर- ११, जालना- १०, नंदूरबार- १०, अहमदनगर- ५, धुळे- ५, गडचिरोली- ४, परभणी- ४, सोलापूर- ३, उस्मानाबाद- २, रत्नागिरी- २, सांगली- २, भंडारा- १, गोंदिया- १, जळगाव- १, कोल्हापूर- १, रायगड- १ आणि पालघर- १ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९८,४८,७९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५१,७९,९२९ (१७.३५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,९१,७८३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,९५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत दिवसभरात १७१७:
मुंबईत दिवसभरात १७१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ६७९१२९ एवढी झाली आहे. तर ५१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १३९०६ मृत्यूची नोंद करण्यात आली.
जाणून घ्या आलेखच्या माध्यमातून :