फोटो सौजन्य - X (ICC)
लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यांमध्ये काल तिसरा दिवस पार पडला. यामध्ये शेवटचा काही मिनिटांमध्ये ड्रामा सामन्यामध्ये पाहायला मिळाला. भारताचे संघाने 387 धावा दुसऱ्या डावामध्ये केल्या. सध्या तिसऱ्या डावामध्ये इंग्लंडचा संघ फलंदाजी करत आहे. काल फक्त इंग्लंडच्या संघाने पहिली ओव्हर खेळली आणि त्यानंतर सामना थांबवण्यात आला. या एक ओव्हरमध्ये भारताचा करण्याचा शुभमन गिल एक वेगळ्या अंदाजात पाहायला मिळाला.
लॉर्ड्सवर भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलचा एक वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. दुसऱ्या दिवशी चेंडू बदलण्यावरून गिल पंचांशी भांडताना दिसला, त्यानंतर तिसऱ्या दिवशी गिलची इंग्लिश खेळाडू जॅक क्रॉलीशीही झटापट झाली. कर्णधार गिलची ही शैली पाहून चाहत्यांना माजी कसोटीपटू विराट कोहलीची आठवण झाली. २०२१ मध्ये कर्णधारपद भूषवणारा विराट कोहलीही इंग्लिश खेळाडूंवर रागावला. त्यानंतर मैदानावर गोंधळ उडाला.
We have seen this one, it’s a classic! 🥶
Lord’s Test. Day 4. We are in for a treat! 🥵#ENGvIND 👉 3rd TEST, DAY 4 | SUN 13th JULY, 2:30 PM | Streaming on JioHotstar pic.twitter.com/SBARXFLjZX
— Star Sports (@StarSportsIndia) July 12, 2025
लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या समाप्तीच्या ६ मिनिटे आधी इंग्लिश संघ फलंदाजीसाठी आला. जिथे जॅक क्रॉलीने इंग्लिश संघासाठी स्ट्राईक घेतला. तिसऱ्या चेंडूपूर्वी क्रॉलीने बुमराहला दोनदा गोलंदाजी करण्यापासून रोखले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर तो जखमी झाला. अशा परिस्थितीत ६ मिनिटांत फक्त एकच षटक टाकता आले. त्यामुळे भारतीय कर्णधार शुभमन गिल अजिबात खूश नव्हता. त्यामुळे तो जॅक क्रॉलीशी भांडला. त्यानंतर पंच आणि सहकारी खेळाडूंनी हस्तक्षेप केला. तरुण कर्णधार गिलचा राग पाहून चाहत्यांना सुपरस्टार विराट कोहलीची आठवण आली.
२०२१ मध्ये जेव्हा भारतीय संघ शेवटचा इंग्लंड दौऱ्यावर गेला होता, तेव्हाही असेच वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी कर्णधार विराट कोहली सर्व इंग्लिश खेळाडूंशी भांडत होता. चाहत्यांना अजूनही कोहलीची जो रूटशी झालेली झुंज आठवते. एवढेच नाही तर कोहलीने त्याच्या सर्व खेळाडूंना जोरदार प्रोत्साहनही दिले. ज्यामुळे भारतीय संघाने शेवटच्या दिवशी सामना जिंकला. आता भारतीय चाहत्यांना या सामन्यातही संघाला ४ वर्षांपूर्वीच्या निकालाची पुनरावृत्ती करताना पहायचे आहे.