IND vs ENG: विराटच्या सर्वाधिक धावा, जॉर्डन विकेट्समध्ये पुढे, भारत आणि इंग्लंडच्या T20 रेकॉर्डवर एक नजर
India vs Bangladesh 1st Test : भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट मॅच येत्या 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. दरम्यान, प्रदीर्घ विश्रांतीनंतर भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईत होणार आहे. या सामन्यातून विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर त्याने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील एकही सामना खेळला नाही.
विराट कोहलीच्या कसोटीत ८८४८ धावा
विराट कोहलीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ८८४८ धावा आहेत. विराटला या फॉरमॅटमध्ये 9000 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. 2011 मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. आतापर्यंत 113 कसोटी सामन्यांच्या 191 डावांमध्ये माजी भारतीय कर्णधाराने 49.15 च्या सरासरीने 8848 धावा केल्या आहेत. विराटच्या नावावर 29 शतके आणि 30 अर्धशतके आहेत. त्याची कसोटीतील सर्वात मोठी खेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद २५४ धावांची आहे.
केवळ तीन भारतीयांच्या नावावर 9000 धावा
कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी फक्त तीन फलंदाजांनी 9000 हून अधिक धावा केल्या आहेत. हा पराक्रम सर्वप्रथम सुनील गावस्कर यांनी १९८५ मध्ये केला होता. कसोटीत 9000 धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज होता. त्यानंतर 2004 मध्ये सचिन तेंडुलकरने 9000 कसोटी धावा पूर्ण केल्या. त्यानंतर 2006 मध्ये राहुल द्रविडचे नाव या यादीत सामील झाले. त्यानंतर भारताचा एकही फलंदाज इथपर्यंत पोहोचू शकलेला नाही. व्हीव्हीएस लक्ष्मणच्या 8781 आणि वीरेंद्र सेहवागच्या 8503 धावा आहेत.
सर्वात संथ धावा करणारा फलंदाज ठरणार
राहुल द्रविडने 176 डावात 9000 धावा पूर्ण केल्या होत्या. सचिन तेंडुलकरने त्याच्यापेक्षा तीन डाव जास्त घेतले होते. सुनील गावसकर यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी 192 डावांमध्ये 9000 कसोटी धावा पूर्ण केल्या. विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 191 डाव खेळले आहेत. जर तो चेन्नई कसोटीत भारताच्या पहिल्या डावात 152 धावा करू शकला नाही तर तो 9000 कसोटी धावा पूर्ण करणारा सर्वात संथ भारतीय फलंदाज ठरेल.






