Jalgaon News: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
जळगाव (वा.) जिल्ह्यात यंदा अलनिनोच्या प्रभावामुळे पावसाने दांडी मारल्याने शेती आणि सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. दुष्काळाच्या अनुषंगाने पाण्याची उपलब्धता वाढविण्यासह सिंचन व्यवस्था सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सरसावले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या ३ हजार ८८५ कामांचे फिजिकल ऑडिट करण्यात येणार असून, त्यातून आवश्यक असलेल्या दुरुस्त्या आणि सुधारणांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाणार आहे. Jalgaon News:
हा अहवाल मंजुरीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिली. दुष्काळ निवारणासाठी सिंचनाची कामे गतीने पूर्ण करण्याचे नियोजन असून, ही कामे मिशन मोडवर राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यंदा पावसाने ओढ दिल्याने शासनाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. जुन्या कामांचे ऑडिट करून सुधारणांवर भरदुष्काळाचा सामना करण्यासाठी केवळ नवीन कामे हाती घेण्याऐवजी यापूर्वी झालेल्या कामांचा प्रत्यक्ष उपयोग किती होत आहे, याची तपासणी करण्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने भर दिला आहे. यासाठी जिल्ह्यातील ३ हजार ८८५ कामांचे फिजिकल ऑडिट केले जाणार आहे.
फिजिकल ऑडिटमधून नेमक्या किती कामांना दुरुस्तीची आवश्यकता आहे आणि त्यासाठी किती निधी लागणार आहे, हे डीपीआर तयार झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या कामांच्या तपासणीपासून ते मजुरी प्रक्रिया किती वेगाने पूर्ण होते, यावर उपाययोजनांची परिणामकारकता अवलंबून राहणार आहे.
Jalgaon News: 13 शिक्षकांच्या पदस्थापनेत नेमकं काय घडलं? सामान्य प्रशासन विभागाला डावलल्याचा आरोप
या तपासणीतून समोर येणाऱ्या आवश्यक कामांचा सविस्तर डीपीआर तयार केला जाणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित कामांच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आधीच झालेल्या कामांचा अधिक प्रभावी वापर करण्यासह सिंचन व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे.
जिल्ह्यात यावर्षी दुष्काळाचे सावट आहे. ८८ पाणीटंचाईचा सामना काही तालुक्याना मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे. त्यामुळे सिंचनाची कामे मिशन मोडवर केली जाणार आहे. आता पर्यंत झालेल्या सिंचनाच्या कामांचे ऑडीट करून डीपीआर जिल्हाधिकारीकडे सादर केला जाणार आहे.
यंदाच्या पावसातील खंडामुळे शेती समोरील संकट अधिक गडद झाले आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा योग्य वापर, सिंचन सुविधांमध्ये सुधारणा आणि पाणी साठवणुकीशी संबंधित कामांना गती देणे महत्वाचे ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने सिंचनाची कामे वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. ही कामे मिशन मोडवर राबविली जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी सांगितले. दुष्काळ निवारणासाठी आवश्यक असलेल्या कामांचे नियोजन, प्रत्यक्ष स्थिती तपासणे आणि सुधारणांसाठी निधी उपलब्ध करून घेण्याच्या प्रक्रियेला यामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
Ans: जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या ३ हजार ८८५ सिंचन कामांचे फिजिकल ऑडिट करण्यात येणार आहे.
Ans: जुन्या कामांचा प्रत्यक्ष उपयोग किती होत आहे, तसेच कोणत्या कामांना दुरुस्ती आणि सुधारणांची गरज आहे, हे तपासण्यासाठी ऑडिट केले जाणार आहे.
Ans: दुष्काळ निवारणासाठी सिंचनाची कामे मिशन मोडवर वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे.






