Kirit Somaiya: किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार; अल्पसंख्यांक समितीची कारवाईची मागणी
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना सोशल मीडियावरून धमकी मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. युसूफ अन्सारी नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट करत सोमय्यांना थेट धमकी दिली असून, येत्या ८ तारखेला त्यांच्या घरी आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी मुंबईतील पवई येथे मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात आंदोलन केलं होतं. या पार्श्वभूमीवरच ही धमकी दिली गेल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या म्हणाले, “मुंबईसारख्या शहरात सुमारे चार हजार अनधिकृत भोंगे आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीने मला फेसबुक पोस्ट करून धमकी देणं हे गंभीर असून, मी अशा फालतू गुंडांना घाबरत नाही.” सध्या पोलिसांकडून या धमकीची दखल घेण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Latur Crime News : फोनवर बोलल्यानंतर गोळी झाडली…; लातूर पालिका आयुक्त मनोहरे प्रकरणी धक्कादायक दावा
“मी८ तारखेला यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करणार आहे. याचा पत्ताही मला आहे.नाहीतर त्याची कॉलर पकडून आम्ही त्याला बाहेर काढ. गवंडी शिवाजीनगर येथील मुसलमानांना माझी विनंती आहे की, आपल्या मशिदींच्या परिसरात पोलिसांची गाडी येत असेल आणि आवाज कमी करण्यासाठी बोलत असेल तर हा माझा संपर्क क्रमांक आहे. मला कॉल करा. कोणीही येत आणि काहीही बोलून जाते. आपण त्यांचे ऐकतो. उटसूट कोणीही येतो आणि बोलत सुटतो हे चालणार नाही. हा महाराष्ट्र, ही मुंबऊ बाबासाहेब आंबेडकर यांची आहे. भाजपच्या हुकूमशाहीने हा देश चालणार. किरीट सोमय्यांना फोन केला होता. पण त्यांनी उचलला नाही.घाबरण्याची गरज नाही. हा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो, बोबड्या आणि तोतऱ्या माणसांकडून हा महराष्ट्र चालवला जात नाही. ही युपीचे राजकारण आहे. पण मुंबईत असे राजकारण कऱण्याचा प्रयत्न कऱत असाल कर खूप महागात पडेल. त्यामुळे कुणालाही घाबरण्याची गरज नाही, आपल्या मशिदींवरील अजाणचा आवाज पुन्हा सुरू करा.”
वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झाले. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीदेखील या विधेयकावर स्वाक्षरी करत या विधेयकाला मान्यता दिली. पण या विधेयकामुळे देशभरात, विशेषतः मुंबईत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील ७२ बेकायदेशीर मशिदींवरील लाऊडस्पीकरांविरोधात किरीट सोमय्या यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत तातडीने कारवाईची मागणी केली.
या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी राज्यभरात बांगलादेशी घुसखोरीविरोधात मोहिमही राबवली आहे. या मोहिमेदरम्यान त्यांनी मुंबईसह मालेगाव, अंबड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, अकोला, लातूर आदी ठिकाणी रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरीचे अनेक प्रकार समोर आणले आहेत. त्यांनी संबंधित यंत्रणांकडे याची नोंद घेत कारवाईची मागणी केली आहे.