लखनऊ : एक अत्यंत रंजक असं प्रकरण आता समोर आलं आहे. यात एका विवाहित तरुणाचा दुसऱ्यांदा विवाह केला गेला. आता त्याला आठवड्यात ३-३ दिवस आपल्या दोन्ही पत्नींसोबत राहावं लागणार आहे. हे संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावरुन जडलेल्या प्रेमाचं (Facebook Friendship) आहे. सोशल मीडियावर (Social Media) झालेल्या ओळखीनंतर युवक आपल्या गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live In Relation) राहू लागला. यादरम्यान ही तरुणी गरोदर राहिली आणि तिनं एका बाळाला जन्म दिला.
आधीपासून विवाहित असलेला युवक या घटनेनंतर गर्लफ्रेंडला सोडून आपल्या गावी परतला. त्याची गर्लफ्रेंड त्याचा शोध घेत अखेर त्याच्या गावापर्यंत पोहोचली. ही तरुणी तिथे पोहोचताच एकच गोंधळ उडाला. हे प्रकरण समोर आल्यानंतर युवकाच्या पत्नीलाही त्याच्या दुसऱ्या लग्नासाठी तयार व्हावं लागलं. यानंतर या युवकानं आपल्या गर्लफ्रेंडसोबतही लग्नगाठ बांधली. इतकंच नाही तर दोन्ही पत्नींमध्ये त्याचं वाटपही झालं.
[read_also content=”साताऱ्यात अल्पवयीन मुलीवर वर्गातल्याच कार्ट्यांनी चाकूचा धाक दाखवून केला बलात्कार; पुढे काय झालं ते जाणून घ्या https://www.navarashtra.com/latest-news/in-satara-a-minor-girl-was-raped-by-the-same-classmates-with-a-knife-find-out-what-happened-next-nrvb-144395.html”]
या युवक आता आपल्या दोन्ही पत्नी आणि आई-वडिलांसोबतही राहाणार आहे. त्याला आता आपल्या दोन्ही बायकांसह मुलांचाही सांभाळ करावा लागणार आहे. या वाटपानुसार आठवड्याचे पहिले तीन दिवस म्हणजेच सोमवार, मंगळवार आणि बुधवार तो आपल्या पहिल्या पत्नीसोबत राहाणार. तर, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार दुसऱ्या पत्नीसोबत. रविवारी त्याला आपल्या आई-वडिलांसोबत वेळ घालवावा लागेल.
ही घटना उत्तर प्रदेशच्या रामपूरमधील ढोंकपुरी टांडा परिसरातील आहे. दीड वर्षापूर्वी या तरुणाची भेट आसाममधील एका मुलीसोबत फेसबुकवरुन झाली. दोघांची मैत्री हळहळू प्रेमात रुपांतरित झाली. यानंतर दोघेही चंदीगडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. यादरम्यान तरुणी गर्भवती झाली. तरुणीला याबाबत काहीही भनक नव्हती की तिचा बॉयफ्रेंड विवाहित आहे.
[read_also content=”रामदेव बाबांच्या ‘या’ कंपनीवर ३,३७५ कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर, बालकृष्ण आणि भाऊ जामीनदार, गुंतवणुकदारांवर काय परिणाम?; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/latest-news/ruchi-soya-baba-ramdev-company-have-to-pay-bank-loan-of-3375-crore-rupees-nrvb-144356.html”]
ही तरुणी गरोदर असल्याचं समजताच युवक गर्लफ्रेंडला सोडून आपल्या गावी फरार झाला. याच काळात या मुलीनं बाळाला जन्म दिला. मुलाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी ही तरुणी त्याच्या शोधात युवकाच्या गावी पोहोचली. पोलिसांच्या मदतीनं ती आपल्या बाळाच्या बापापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरली. हे प्रकरण उघड होताच युवकाच्या घरी एकच गोंधळ उडाला. बराच वेळ चाललेल्या गोंधळानंतर अखेर या युवकाला आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करावं लागलं. आता त्याला आपल्या दोन्ही पत्नींसोबत राहावं लागणार आहे.
man tied knot second time with girlfriend and now he have to punish give time to both