रशिया युक्रेन युद्धाचा आज 14 वा दिवस आहे. रशिया युक्रेनवर हल्ला तीव्र करत आहे, यामुळे ज्याबद्दल जगभरातील देश नाराज आहेत. आतापर्यंत अनेक देशांनी लादले आहेत, तर मोठ्या कंपन्याही रशियाच्या विरोधात आणि युक्रेनच्या समर्थनार्थ पावले उचलताना दिसत आहेत. यामध्ये, आता रशियामधील सर्व मॅकडोनाल्ड्स 850 रेस्टॉरंट तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी दोन्ही देशांमध्ये चर्चेची तिसरी फेरी झाली, मात्र ही चर्चेची फेरीही निष्फळ ठरली. मिळालेल्या माहितीनुसार, मॅकडोनाल्ड्सने रशियातील सर्व 850 रेस्टॉरंट कर्मचार्यांना एक पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ क्रिस केम्पझिंस्की यांनी सांगितले की, सध्या रेस्टॉरंट बंद करण्याचे ठरवले आहे कारण, मॅकडोनाल्ड्स युक्रेनवर अशा हल्ल्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. दरम्यान, मॅकडोनाल्डने आपल्या कर्मचार्यांचा विचार लक्षात घेऊन रेस्टॉरंट बंद असतानाही रशियामधील सर्व 62 हजार कर्मचार्यांना पगार देत राहणार असल्याचं सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रशियातील 84 टक्के रेस्टॉरंट मॅकडोनाल्डकडे आहेत. गेल्या वर्षी कंपनीच्या महसुलात रशिया आणि युक्रेनचा वाटा 9 टक्के असल्याचे कंपनीने म्हटले. यापूर्वी केएफसी (KFC) आणि पिझ्झा हट (Pizza Hut) यांनीही त्यांची गुंतवणूक थांबवण्याचा निर्णय घेत युक्रेनला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे