महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावल्यामुळे सर्व चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगला राज्याबाहेर जावे लागत आहे. झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेचे शूटिंग सध्या सिल्वासा येथे करण्यात येत आहे. रविवारीच आंतरराष्ट्रीय मदर्स डे सेलिब्रेट करण्यात आला. मालिकेची सर्व टीम बायो बबलचं पालन करत असल्यामुळे कोणालाच आपल्या मुलांसोबत किंवा आईसोबत प्रत्यक्ष हजेरी लावता आली नाही. अशातच सेटवर केक आणि एक भावनिक पत्र आल आणि सर्वांच्याच डोळ्यात पाणी तरळलं.
जाहिरातजाहिरातView this post on Instagram
अभिनेत्री शुभांगी गोखले यांची कन्या आणि अभिनेत्री सखी गोखले हिने मदर्स डे निमित्त केकसोबत एक पत्रही पाठवले. “अम्मा (शुभांगी गोखले), अदिती, दीप्ती, शुभांगी आणि ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील सर्व ऑन आणि ऑफ स्क्रीन मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इतक्या छान आई होण्यासाठी आभार. आमचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून घरापासून दूर राहून काम करण्यासाठी धन्यवाद” असे सखीने पत्रात लिहिले आहे.
हे पत्र वाचून शुभांगी गोखले तर भावनावश झाल्याच, पण सेटवरच्या इतर आयांना मुलांच्या आठवणींनी आणि मुलांना आईच्या आठवणीनी रडायला आलं, या वैश्विक संकटकाळात तू पाठवलेलं प्रेम.. सगळं भरुन पावलं, असं त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितलं.






