वैभव सूर्यवंशीची शानदार कामगिरी (फोटो- ट्विटर)
वैभव सूर्यवंशीबाबत शुभमन गिलचे भाष्य
आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा वैभवचा विक्रम
31 मे रोजी शुभमन गिल अन रजत पाटीदार आमनेसामने
IPL 2026: आयपीएल 2026 चा महासंग्राम संपत आला आहे. उद्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम सामना होणार आहे. क्वालिफायर 1 मध्ये गुजरातचा संघ पराभूत झाला होता. मात्र क्वालिफायर 2 मध्ये गुजरातने राजस्थानचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. राजस्थानकडून यंदा पूर्ण हंगामात वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली आहे. वैभवच्या कामगिरीवर आता भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने प्रतिक्रिया दिली आहे.
क्वालिफायर 2 मध्ये शुभमन गिलच्या शतकी खेळीवर गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यापूर्वी गुजरात टायटन्सचा कर्णधार आणि भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिल याने राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. क्वालिफायर 2 मध्ये वैभव सूर्यवंशीने 96 रन्सची आक्रमक खेळी केली होती. या खेळीनंतर गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने वैभवला “जगातील सध्याच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक” असे संबोधले आहे.
काय म्हणाला शुभमन गिल?
कर्णधार शुभमन गिलने वैभव सूर्यवंशीचे कौतुक केले आहे. वैभव सूर्यवंशीसाठी यंदाचा हंगाम खरोखरच शानदार राहिला आहे. मी याधी कोणत्याही खेळाडूला अशा प्रकारे फलंदाजी करताना पाहिलेले नाही. सध्या तो टी-20 मध्ये सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक फलंदाज आहे. वैभवच्या हातांचा वेग इतर फलंदाजांच्या तुलनेत खूप जास्त आहे, ज्यामुळे तो वेगवान गोलंदाजांना सहज खेळू शकतो. तो तांत्रिकदृष्ट्या खूप सक्षम आहे. येणाऱ्या काळात वैभव ज्या संघाविरुद्ध खेळेल, त्यांच्यासाठी तो मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
हरल्यानंतर वैभवची पहिली भावूक प्रतिक्रिया
मुल्लानपूर, न्यू चंदीगड येथे झालेल्या सामन्यातील पराभवानंतर, राजस्थान रॉयल्सने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक भावनिक संदेश शेअर केला. वैभव सूर्यवंशीनेही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा संदेश शेअर करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली. संघाच्या पराभवामुळे तो किती खोलवर दुःखी झाला आहे, हे या इन्स्टाग्राम स्टोरीवरून दिसून येते.
RCB vs GT Final मध्ये पावसाचा खोळंबा ? सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार IPL ट्रॉफी? वाचा ‘हे’ नियम






