बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून शहरभर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. संवेदनशील भाग, प्रमुख चौक, मशिदी परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून अफवा, आक्षेपार्ह पोस्ट आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडिया संदेशांवर सायबर सेलची विशेष नजर ठेवण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.