पुणे: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), खडकवासला येथे शनिवारी १५० व्या तुकडीचा ऐतिहासिक पासिंग आऊट परेड (POP) समारंभ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या सोहळ्यात तीन वर्षांचे खडतर लष्करी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून ३५३ कॅडेट्स देशाच्या सेवेसाठी सज्ज झाले. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र दिवेदी यांनी या दिमाखदार संचलनाची पाहणी केली आणि मानवंदना स्वीकारली. प्रबोधिनीच्या प्रसिद्ध क्षेत्रपाल मैदानावर झालेल्या या शिस्तबद्ध संचलनाचे नेतृत्व कॅडेट मयांक चौधरी याने केले. ‘कदम कदम बढाए जा’ या सुमधुर आणि स्फूर्तीदायक धूनवर एकूण १,२५० कॅडेट्सनी एकाच लयीत पावले टाकत मैदानावर संचलन केले. यावेळी भारतीय संरक्षण दलाच्या सामर्थ्याची प्रचिती देत तीन चेतक हेलिकॉप्टर, सुपर डिमेनो विमान आणि सुखोई लढाऊ विमानांनी मैदानावरून विहंगम उड्डाण करत नवदीक्षितांना मानवंदना दिली.यावर्षी यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या ३५३ कॅडेट्सपैकी २९२ कॅडेट्स लष्करात (Army), ४३ जण नौदलात (Navy) आणि ८१ जण वायुदलात (Air Force) पुढील एक वर्षाच्या प्रगत प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहेत. यामध्ये भारताच्या १२ मित्रदेशांमधील २४ परदेशी कॅडेट्सचाही समावेश आहे, ज्यांनी एनडीएमध्ये आपले प्रशिक्षण पूर्ण केले.