नागपूर (Nagpur). शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे धडाक्यात सुरू आहे. परंतु, केंद्र सरकोरच्या गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या ‘इंडिया स्मार्ट सिटीज अॅवॉर्ड’ (India Smart Cities Award) या स्पर्धेत शहराला पहिल्या १०० मध्येही स्थान मिळवता आले नाही.
[read_also content=”गरिबांचं घराचं स्वप्न अखेर स्वप्नचं राहिलं; यशवंतराव मुक्त वसाहत योजना कागदावर विरली https://www.navarashtra.com/latest-news/the-dream-of-a-home-for-the-poor-finally-became-a-dream-yashwantrao-mukta-vasahat-yojana-is-rare-on-paper-nrat-147920.html”]
विशेष म्हणजे, इंदोर व सुरत ही दोन शहरे सर्वोत्तम ठरली आहेत. उत्तर प्रदेशने राज्य गटात तर कल्याण डोंबिवली महापालिकेने करोना इनोव्हेशनगटात स्थान पटकावले आहे.स्मार्ट सिटी मिशनला सहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या पुरस्कोरांची घोषणा करण्यात आली. यात केंद्रीय गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने पहिल्यांदाच स्मार्ट सिटीमध्ये त्यांच्या भूमिकेबद्दल राज्यांनी केलेल्या कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आले आहेत.
नागपूर शहरात नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (एनएसएसडीसीएल) माध्यमातून अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. पारडी, भरतवाडा आणि पुनापूर या भागातील १ हजार ७३० एकर जमिनीवर विविध प्रकल्पांचे कोम सुरू आहे. तरीही या पुरस्कारांमध्ये नागपूरला जागा मिळवता आली नाही.