नक्षलवादी भूपती याने हिडमच्या मृत्यूनंतर नक्षलवाद सोडून संविधान हाती घेण्याचे आवाहन केले (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Naxalism : गडचिरोली : नक्षली संघटनेचा कुख्यात जहाल नक्षली माडवी हिडमा याचा मंगळवारी (दि. १७) छत्तीसगड राज्यातील जंगल परिसरात सुरक्षा न दलासोबत झालेल्या चकमकीत खात्मा झाला. यानंतर पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली असून नक्षल विरोधी असून हे अभियान अधिक तीव्र केले आहे. या पार्श्वभूमीवर आत्मसमर्पित नक्षल नेता भूपतीने चित्रफित जारी करून उर्वरित नक्षलवाद्यांना हिंसा सोडा, संविधानाचा त मार्ग स्वीकारा, असे आवाहन केले. छत्तीसगड-आंध्रपदेश सीमेवर मंगळवारी झालेल्या चकमकीत नक्षल संघटनेचा सर्वांत कुख्यात कमांडर तथा केंद्रीय समिती सदस्य माडवी हिडमा, त्याची पत्नी राजे आणि इतर सहा सदस्य ठार झाले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर नक्षलवादाचा त्याग करून मुख्य प्रवाहात आलेल्या नक्षलवादी चळवळीतील एकेकाळचा सर्वोच्च नेता (दि. १९) व्हिडिओ संदेश जारी केला आहे. ‘बंदूकीच्या मार्गाने आजवर खूप काही गमावले, यातून काहीही साध्य होऊ शकले नाही. त्यामुळे आता शस्त्रे खाली ठेवा आणि मुख्य प्रवाहात या’, संविधानाचा मार्ग स्वीकारा, असे आवाहन त्याने केले आहे. हिडमाच्या मृत्यूने नक्षली नेतृत्वत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. व्हिडीओच्या शेवटी, आत्मसपर्मण करून इच्छिणाऱ्या नक्षलवाद्यांना थेट संपर्क साधता यावा यासाठी भूपतीने आपला मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा जाहीर केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बंदुकीत नाही तर संविधानातच खरी शक्ती
सध्याची नक्षल चळवळीतील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे भूपतीचे म्हणणे आहे. बंदुकीच्या मार्गाने काहीही साध्य झाले नाही, केवळ निरपराध जीव गमावले जात आहेत, असे नमूद करीत त्याने नक्षलवाद्यांना पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले आहे. जग प्रगती करीत आहे, देश बदलत आहे. संविधानातच खरी शक्ती असून बंदुकीत नाही, अशा स्पष्ट शब्दात भूपतीने आपले मत मांडले. आता लोकांच्या समस्यांसाठी घटनात्मक चौकटीतूनच लढा द्यावा लागणार असल्याचे त्याचे म्हटले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील नक्षलवादी दहशतीपासून पूर्णपणे मुक्त करण्याची घोषणा केली. त्यानुसार, कुख्यात नक्षलवाद्यांना वेढा घालून त्यांचा खात्मा करण्यासाठी किंवा त्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडण्यासाठी दबाव आणण्यासाठी सुरक्षा दल नियोजनबद्ध आणि समन्वित कारवाई करत आहेत. आंध्र प्रदेशातील मारेदुमिल्ली भागात सुरक्षा दलांनी एका चकमकीत भयानक नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा आणि त्याच्या दोन पत्नींना ठार मारले. यामुळे नक्षलवादाचा कणा मोडला आहे. हिडमा पाच मोठ्या चकमकींमध्ये सहभागी होता आणि त्याने दोन दशकांपासून पाच राज्यांमध्ये कहर केला होता. तो छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये एक दहशतवादी होता.






