पुण्यात थंडीचा कडाका वाढला (फोटो- सोशल मीडिया)
पुण्यात काही दिवसांपासून थंडीचा कडाका कायम
तापमानात किरकोळ चढ-उतार
सकाळी आणि रात्री जाणवत आहे हवेत गारवा
पुणे: शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लहर कायम असून सकाळ-संध्याकाळ गारठा जाणवत आहे. तापमानात किरकोळ चढ-उतार दिसत असले तरी हिवाळ्याची चाहूल कायम आहे. गुरुवारी (दि. २०) पुण्यातील किमान तापमान ११ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ( दि. २१) किमान तापमान १२ अंश सेल्सिअस आणि कमाल ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.गेल्या काही दिवसांपासून सकाळी लवकर आणि रात्री उशिरापर्यंत गारवा जाणवत आहे. नागरिक विशेषत: उबदार कपडे, स्वेटर आणि शॉलचा वापर करताना दिसत आहेत. तरीही दिवसाच्या वेळेत उन्हाचा चांगला उगम असल्याने तापमानात थोडीशी वाढ जाणवते.हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस शहरातील तापमानात सौम्य वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गारठवणाऱ्या थंडीपासून पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. मात्र थंडीचा प्रभाव कायम असणार आहे.
पुणे की शिमला? नागरिक गारठले
शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. सोमवारी (ता. १८) पुणे परिसरात ९.४ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी किमान तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे पुणेकर थंडीने गारठले आहेत. तर पुढील दोन दिवसांत किमान आणि कमाल तापमानात अंशतः वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
शहर आणि उपनगर परिसरात किमान तापमानात गेल्या एका आठवड्यात पाच अंश सेल्सिअसची घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी १५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आलेले किमान तापमान मंगळवारी ९.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. शहरातील पाषाण भागात ९ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले आहे. परिणामी पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये गारठा वाढला आहे. शहरात पहाटे आणि रात्री थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. तर दिवसा सूर्यप्रकाश असला तरी हवेत गारवा टिकून असल्याने थंडीची जाणीव कायम राहते. तर पुढील दोन दिवस किमान आणि कमाल तापमानामध्ये आणखी किंचित वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?
पुणे आणि परिसरामध्ये बुधवारी (ता. १९) कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढणार असून कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर बुधवारपासून पुढील तीन दिवस कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस पर्यंत नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.






