मुंबई : देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. दरम्यान लसीकरणासंदर्भात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. लसीकरणासाठी कोविन ॲपवर मोबाइल नंबर व आधार कार्डद्वारे नोंदणी करण्यात आली. यानंतर ओटीपीसुद्धा आला, मात्र ओटीपी टाकल्यानंतर जो मेसेज आला तो वाचून एकच धक्का बसला. या मेसेजमध्ये लिहिलं होतं की, तुमचं लसीकरण गेल्या महिन्यापूर्वीच झालं आहे. मुंबईतील एका माजी लष्करी अधिकाऱ्यासोबत ही घटना घडली आहे.
दरम्यान कोविन ॲपसंदर्भात यापूर्वी देखील अनेक गोंधळ उडवणाऱ्या घटना घडल्या आहेत. असा गोंधळ दूर करण्यासाठी आणि लस योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र सरकारने ‘ओटीपी’ (वन टाइम पासवर्ड) ही प्रणाली सुरू केली. परंतु असं असूनही ओटीपी हॅक झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मोबाइल नंबर ‘क्लोन’च्या आधारे बोगस पद्धतीने लस घेतल्याची प्रकरणं समोर आली आहेत.
[read_also content=”घात झाला! लाँच होण्यापूर्वीच मायक्रोसॉफ्टची मोठी माहिती लीक; स्टार्ट मेनू आणि युझर इंटरफेस मध्ये होणारे बदल https://www.navarashtra.com/latest-news/shocking-microsoft-big-information-windows-11-leaked-before-the-launch-event-nrvb-143526.html”]
एका माजी लष्करी अधिकाऱ्याने कोविन ॲपवर ओटीपी टाकल्यावर, तुमचं लसीकरणं झालं आहे असा मेसेज आला. जेव्हा याची सविस्तर माहिती मिळाली तेव्हा समजलं की ही लस घेणारा व्यक्ती नोएडाचा रहिवासी आहे. या व्यक्तीने संबंधित लष्कराच्या अधिकाऱ्याने वापरलेला मोबाइल नंबर एका महिन्यापूर्वीच ‘ओटीपी’ मिळवण्यासाठी वापरला. यावरून त्याने लसीकरणही करवून घेतलं.
या सैन्य अधिकाऱ्याने त्याचा मोबाईल तपासला असता, नोएडामध्या राहणाऱ्या व्यक्तीने ज्या ओटीपीने लसीकरण केलं होतं तो ओटीपी एका महिन्यापूर्वीच मोबाइलमध्ये आला होता. पण त्यावेळी त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्याच ओटीपीच्या आधारे नोएडातील व्यक्तीने लसीकरण केलं.
[read_also content=”स्मार्ट फोनमुळे आपल्या त्वचेचेही होते नुकसान! मानेवरही पडतात सुरकुत्या; जाणून घ्या याचे दुष्परिणाम https://www.navarashtra.com/latest-news/smart-phones-also-damage-your-skin-know-the-side-effects-in-details-nrvb-143473.html”]
फरक इतकाच होता की लसीकरणासाठी या व्यक्तीने आधार कार्डचा नंबर वेगळा वापरला होता. याचा अर्थ मुंबईत राहणाऱ्या या सैन्य अधिकाऱ्याचा मोबाइल नंबर नोएडामध्ये राहणा त्या व्यक्तीच्या आधार क्रमांकाशी जोडलेला होता. म्हणजे नोएडामध्ये राहणाऱ्या व्यक्तीने मुंबईमध्ये राहणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याचा मोबाइल हॅक केला आणि ओटीपी वापरला.
on the cowin app put the otp and former military officer shocked