Photo Credit- Social Media
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 17 हून अधिक जण जखमी झाले आहेत. हे हल्ले बैसरण व्हॅली याठिकाणी झाले. बैसरणच्या हिरव्यागार टेकडीवर, पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत असताना तिथे अचानक दहशतवाद्यांकडून गोळ्यांचा जोरदार वर्षाव झाला. हातात मोठ्या बंदुका घेतलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर जवळून गोळीबार केला. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ज्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा समावेश आहे. हल्ल्याच्या वेळी ते आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी गेले होते. या घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ज्याला “मिनी-स्वित्झर्लंड” म्हणून ओळख असलेल्या पहलगामच्या बैसरण खोऱे आज रक्ताने आणि अश्रूंनी माखून गेले आहे. मंगळवारी (२२ एप्रिल) एका दहशतवाद्यांच्या गटाने केलेल्या हल्ल्यामुळे खोऱ्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी पर्यंटकांचे धर्म विचारून, त्यांची ओळख विचारून त्यांच्यावर गोळीबार केला. यात २६ निष्पापांचे जीव घेतले.
दुसरीकडे या हल्ल्याकडे पाहिले असता, TRF ने या हल्ल्यात इस्त्रायल-हमास हल्ल्याचा पॅटर्न दिसून येत आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला झाला होता. इस्रायलमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी अशाच प्रकारे १२०० लोकांची हत्या केली होती. यामध्ये रीमजवळील नोव्हा संगीत महोत्सवात सहभागी झालेले २५० इस्रायली लोकांचा समावेश होता. याशिवाय, हमासच्या दहशतवाद्यांनी २५० इस्रायलींनाही ओलीस ठेवले होते.
या दोन्ही घटनांमध्ये, द्वेषाने भरलेल्या काही दहशतवाद्यांनी पर्यटनाचा आनंद घेत असलेल्या नि:शस्त्र आणि निष्पाप नागरिकांना लक्ष्य केले. पहलगाममध्ये, पाकिस्तान पुरस्कृत टीआरएफ दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले, त्यांना अझान म्हणण्यास सांगितले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात, हमासच्या दहशतवाद्यांनी निवडकपणे ज्यू नागरिकांची, विशेषतः गाझा सीमेजवळील समुदायांची हत्या केली. दोन्ही हल्ल्यांमध्ये, धर्माच्या आधारे लोकांना निवडण्याचे दहशतवाद्यांचे धोरण स्पष्टपणे दिसून आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी त्यांच्या शरीरावर कॅमेरे लावले होते. त्याने संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले. दहशतवाद्यांनी सर्वांना घटनेच्या ठिकाणी एकत्र केले, त्यांना ओळखले आणि नंतर त्यांच्यावर हल्ला केला.
इस्रायलमध्ये हल्ला करण्यासाठी हमासच्या दहशतवाद्यांनी रॉकेट बॅरेज, पॅराग्लायडर आणि वाहनांचा वापर करून इस्रायलमध्ये घुसखोरी केली होती. त्यांची संख्या शेकडोंमध्ये होती. पहलगाममध्ये लष्कराचा गणवेश परिधान केलेल्या चार ते सहा दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याचे मानले जाते. अहवालानुसार, दहशतवाद्यांनी या ठिकाणाची आधीच रेकी केली होती. जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या पर्यटन हंगाम आहे. पहलगामच्या बैसरण खोऱ्यात सध्या पर्यटकांची मोठी गर्दी आहे. येथे मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित होते. हे ठिकाण तुलनेने शांत मानले जाते, त्यामुळे येथे सुरक्षा तैनात नव्हती. याचा फायदा घेत दहशतवाद्यांनी पहलगामवर हल्ला केला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया; संरक्षण मंत्री म्हणतात, ‘आमचा काहीही संबंध नाही’