Pakistan Selection Committee : इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानचा एक डाव आणि ४७ धावांनी पराभव झाल्यानंतर काही तासांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नवीन निवड समितीची घोषणा केली आहे. त्यात माजी कसोटीपटू आकिब जावेद, अझहर अली, कसोटी पंच अलीम दार आणि विश्लेषक हसन चीमा यांचा समावेश आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घाईघाईत मोठे बदल केले आहेत. आता याचा संघावर किती परिणाम होतो हे भविष्यातच कळेल.
पॅनेलचे मुख्य निवडकर्ता कोण
मोहम्मद युसूफ यांनी पॅनेलचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या 10 दिवसांनी ही घटना घडली आहे. हा बदल अशा वेळी आला आहे जेव्हा पाकिस्तानची सर्व फॉरमॅटमध्ये खराब कामगिरी झाली आहे. या तिघांमध्ये माजी खेळाडू असद शफीक आणि संघ विश्लेषक हसन चीमा यांचा समावेश आहे, ज्यांना आता निवड समितीमध्ये मतदानाचा हक्क आहे. पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (पांढरा चेंडू) आणि जेसन गिलेस्पी (लाल चेंडू) निवड समितीवर मतदान सदस्य म्हणून राहतील की नवीन पॅनेलचे मुख्य निवडकर्ता कोण असतील हे पीसीबीने स्पष्ट केले नाही.
चालू हंगामात शेवटच्या वेळी अंपायरिंग
अलीम दारने नुकतेच जाहीर केले होते की तो चालू हंगामात शेवटच्या वेळी अंपायरिंग करणार आहे. पाकिस्तानच्या निवड समितीमध्ये नामवंत पंचाचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. नवीन निवड समितीचे पहिले काम इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तान संघाची निवड करणे हे असेल, 15 ऑक्टोबरपासून दुसरी कसोटी सुरू होईल. मुलतानमधील पहिल्या कसोटीत झालेल्या दणदणीत पराभवानंतर, पहिल्या डावात ५०० हून अधिक धावा केल्यानंतर एका डावाने सामना गमावणारा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला संघ बनला.