एचआयव्ही बाधित मुलीवर केला अत्याचार (File Photo : Crime)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे एका 30 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये तिघांनी मिळून हे घृणास्पद कृत्य केल्याचे उघडकीस आले. पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद देताच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
हेदेखील वाचा : सुप्रीम कोर्टाने दिलेला अल्टिमेटम संपला, तरीही आरजी कार हॉस्पिटलचे डॉक्टर संपावर ठाम, आता पुढे काय?
नरेंद्र मोरया, प्रकाश सिंह, पंचराज सिंह अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या तीनही आरोपींना अटक केली. या तक्रारीनंतर, विविध कलमांतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. पीडित महिला ही पोलिस ठाण्यात गेल्यानंतर तिने घडला प्रकार सांगितला. त्यानंतर नालासोपाऱ्यातील आचोळे पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी
दरम्यान, या अत्याचार प्रकरणातील आरोपी नरेंद्र मोरया, प्रकाश सिंह, पंचराज सिंह यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बापाने केला पोटच्या मुलीवर अत्याचार
राज्यात महिलांवरील अत्याचार वाढ होताना दिसत आहे. त्यातच वडिलाने स्वतःच्या नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना नागपुरात घडली होती. आशा सेविकेमुळे हा प्रकार उघड झाला आणि पोलिसांत पोहोचला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता नालासोपारा येथे अत्याचाराची घटना उघडकीस आली.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता 30 वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
हेदेखील वाचा : आंदेकर हत्येप्रकरणाची पुनरावृत्ती? सख्ख्या भावानेच संपत्तीसाठी भावाला संपवलं; आधी धमकी दिली अन् नंतर…