File Photo : Murder_Crime
नागपूर : पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही हत्या त्यांच्या सख्ख्या बहिणींनी घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. त्यानंतर आता नागपुरातही मेहुण्यांसोबत मिळून सख्ख्या भावाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही हत्या संपत्तीसाठी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एच. जाधव यांनी चार आरोपींना दोषी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
हेदेखील वाचा : खळबळजनक ! बापानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोटात दुखतंय म्हणाली अन्…
न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या दोषींमध्ये आसिफ अली सय्यद अली (वय 40, रा. जयहिंदनगर, मानकापूर), जावेद खान हबीब खान (वय 35, रा. शम्स कॉलनी, मोर्शी), तमीज खान हफीज खान (वय 25) आणि सादिक खान आबिद खान (वय 26) अशी दोषींची नावे आहेत. त्यांच्यावर जयहिंदनगर निवासी अमीन अली सय्यद अली (वय 41) च्या खुनाचा आरोप होता. पोलिसांनी 10 ऑगस्ट 2020 रोजी अमीनची पत्नी आलियाच्या तक्रारीवरून खून आणि गुन्हेगारी कट रचण्यासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला होता.
अमीन आणि आसिफ हे दोघे सख्खे भाऊ
अमीन आणि आसिफ हे सख्खे भाऊ आहेत. दोघेही जयहिंदनगरातील जुन्या घरी कुटुंबासह राहत होते. तळमाळ्यावर दोन दुकानेही होती, जी भाड्याने दिली होती. 2009 पासून दोन्ही भावांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू होता. अनेकदा त्यांचा वाद मानकापूर पोलिस ठाण्यातही पोहोचला होता. घटनेच्या 9 दिवसांपूर्वी आसिफ कुटुंबासह मोर्शी येथे सासरी गेला होता. 10 ऑगस्टच्या सकाळी आसिफने भाडेकरू दुकानदार आमिर अलीला फोन करून सांगितले होते की, तो आज अमीनचा कायमचा काटा काढणार आहे. आमिरने आलियाला याबाबत सांगितले.
आलियाने अमीनला सावध राहण्यास सांगितले होते. रात्री 9.30 वाजताच्या सुमारास अमीन आणि आमिर घराजवळील दुकानासमोर उभे होते. या दरम्यान आसिफ आणि त्याचे साळे जावेद, तमील व सादिक चारचाकी वाहनाने तेथे आले. चौघांनीही लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला केला.
अमीन जीव वाचवण्यासाठी पळाला पण…
अमीन जीव वाचविण्यासाठी तेथून पळाला. मात्र, आरोपींनी त्याला पकडून मारहाण सुरू केली. आमिरने त्याच्या घरी जाऊन आलियाला घटनेची माहिती दिली. तोपर्यंत आरोपींनी रॉड आणि चाकूने सपासप वार करून अमीनचा खून केला होता. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये आरोपी स्पष्ट दिसत होते.
हेदेखील वाचा : ‘तेव्हा मी थरथर कापते…,’ कोलकाता अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या आई-वडिलांनी पोलिसांवर केले गंभीर आरोप