मॅाडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेनं (Poonam Panday) काही दिवसापुर्वी स्व:तच्या मृत्यूचा रचलेला बनाव (Poonam Pandey Fake Death) आता उघड झाला आहे. हे मृत्यूकांड तिला महागातही पडलं आहे. तिच्या विरुध्द अनेक तक्रारीही करण्यात आल्या. मध्यंतरी तिनं तिच्या इन्टाग्रामवरील सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या. त्यामुळे ही पुन्हा ही ड्रामाक्वीन नवं काय करणार, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. तिचं ट्रोलींग काही थांबेलेलं नसताना आता ती पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे. हातात पूजेचं ताट घेऊन मंदिरात आल्याचा व्हिडिओ सोशल सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे पूनमला तिनं केलेल्या कर्माची आता उपरती झाली की काय नेटकऱ्यांना वाटायला लागलं आहे.
[read_also content=”वेब सीरीज ‘गुलक सीझन 4’ चं शूटिंग पूर्ण, निर्मात्यांनी पोस्ट केली शेअर; चाहत्यांचा वाढवला उत्साह! https://www.navarashtra.com/movies/tvf-wraps-web-series-gullak-season-4-shooting-makers-shares-poster-show-will-be-release-soon-nrps-509671.html”]
एका पापाराझीने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये पूनम खुपचं आंनदी दिसत आहे. मात्र, पुनमच्या या व्हिडिओवर लोक तिला प्रचंड ट्रोल करत आहेत. एका यूजरन लिहिलयं, “ती अंडरटेकरची बहीण आहे.” आणखी एका यूजरनं लिहिलयं, “आता हिला खरोखर पाहिल्यानंतर असे वाटेल की ते भूत आहेत.” त्याच वेळी, दुसऱ्या एका युझरनं तिचा पुनर्जन्म झालं असं म्हटलं.
काही दिवसांपूर्वी पूनमच्या मृत्यूची बातमी देशभरात खळबळ उडाली होती. तिच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली देखील वाहिली होती. यामध्ये कंगना राणौत, अनुपम खेर या कलाकारांचा समावेश होता.
काही दिवसापुर्ववी पूनम पांडेनं इन्स्टावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये लिहिलं आहे, सत्य लवकरच समोर येईल. यासोबतच तिनं गेल्या काही दिवसांत सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील सगळ्या पोस्टही डिलीट केल्या होत्या. मात्र तेव्हाही तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं.