पुणे : पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेतांना रंगेहाथ पकडलं आहे. तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांनी लाच स्वीकारत होते. त्याचवेळी ही कारवाई करण्यात आली. प्रमोद चिंतामणी (35) असं लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. हा पोलीस अधिकारी पिंपरी चिंचवड आयुक्तालयात आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे.
Vote Chori ची तक्रार अन् पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
२ कोटी रुपयांची मागितली लाच
तक्रारदाराच्या वडिलांना एका गुन्ह्यात अटक झाली होती. त्यासाठी आरोपीने तक्रारदाराच्या अशिलालाल गुन्हेगारी प्रकरणात मदत करण्यासाठी आणि त्याच्या वडिलांना जमीन मिळून देण्यासाठी एकूण दोन कोटी रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे लेखी तक्रार केली. तक्रारदाराच्या वडिलांना एका गुन्ह्यात अटक झाली होती. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी या प्रकरणाचा तपास करत आहे.
१ कोटी स्वतःसाठी तर १ कोटी वरिष्ठ…
२७ ऑक्टोबरला पडताळणी कारवाई झाली तेव्हा आरोपीने अचानक आपल्या मागणीत प्रचंड वाढ केली. त्यांनी तक्रारदाराच्या अशिलाला मदत करण्यासाठी व जामीन मिळून देण्यासाठी २ कोटी रुपयांची लाच मागितली होती. यामध्ये १ कोटी स्वतःसाठी आणि १ कोटी त्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला देण्याचे ठरले होते. यापैकी 50 लाख रुपयांचा पहिला हप्ता लवकरात लवकर देण्याचे निश्चित झाले होते.
सापळा रचत केली कारवाई
रविवारी याप्रकरणी एसीबीने सापळा रचला. यादरम्यान आरोपी प्रमोद चिंतामणीने उंटाड्या मारुती मंदिरासमोर तक्रारदाराकडून 46 लाख 50 हजारांची लाच स्वीकारली. एसीबीने प्रमोद चिंतामणीची झडती घेतली असता 45 लाख 50 हजार रुपयांची रक्कम सापडली. तसच सॅमसंग फोल्ड आणि ॲपल आयफोन असे दोन मोबाईल फोन, रोख 3600 रुपये आणि शासकीय ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे.
गुन्हा दाखल
प्रमोद चिंतामणी (35) असं लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. आरोपी हा चिंतामणीविरोधात पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशन, शहर आयुक्तालय येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






