लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं टोमॅटो सॉस खायला खूप जास्त आवडतो. सँडविच, पास्ता, फ्राईज, पराठा इत्यादी पदार्थांसोबत टोमॅटो सॉस आवडीने खाल्ला जातो. पण लहान मुलांच्या आरोग्यासाठी टोमॅटो सॉस अतिशय घातक ठरतो. कारण यामध्ये साखर, व्हिनेगर, मीठ, कृत्रिम चव आणि प्रिझर्वेटिव्ह इत्यादी अनेक पदार्थांचा वापर केला जातो. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ रोजच्या आहारात सतत खाल्ल्यास आतड्याना हानी निर्माण होऊ शकते.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नियमित टोमॅटो सॉस खाल्ल्यास शरीराला नेमके काय तोटे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
लहान मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरेल टोमॅटो सॉस! 'या' समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी चुकूनही करू नका सेवन

टोमॅटो सॉस बनवताना त्यात रिफाइंड साखर आणि उच्च फ्रुक्टोज कॉर्न सिरपचा जास्त वापर केला जातो. यामुळे शरीरात लठ्ठपणा वाढण्याची जास्त शक्यता असते.

चवीला सुंदर लागणारे सर्वच पदार्थ आरोग्यासाठी चांगले नसतात. त्यामुळे लहान मुलांनानियमित टोमॅटो सॉस खाण्यास देऊ नये. यामुळे शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते.

लहान मुलांची पचनसंस्था अतिशय नाजूक असते. त्यामुळे हानिकारक प्रिझर्वेटिव्ह्जचा वापर करून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास गॅस, अपचन, पोटात दुखणे किंवा ऍसिडिटी इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

हानिकारक रंगाचा वापर करून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. चिडचिडेपणा, एकाग्रता कमी होणे, अतिक्रियाशीलता आणि वर्तनात होण्याची शक्यता असते.

लहान मुलांना सतत टोमॅटो सॉस खाण्यास दिल्यामुळे पुढच्या जीवनात उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर आणि मेटाबॉलिक सिंड्रोम होण्याची शक्यता असते.






