रतन टाटा उद्योगपती नव्हते तर देशाचे आधारस्तंभ होतो; संजय राऊत यांच्याकडे आदरांजली
मुंबई : टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने भारताच्या उद्योगजगतात मोठी शोककळा पसरली आहे. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आदरांजली अर्पण केली. ‘रतन टाटा उद्योगपती नव्हते. ते या देशाचे आधारस्तंभ आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून देशाचा औद्योगिक विकास देशाला मिळालेला रोजगार देशाला मिळालेली प्रतिष्ठा या सर्वांमागे टाटांचं योगदान आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.
रतन टाटा यांची तब्येत सोमवारी अचानक बिघडल्याचे समोर आले होते. मात्र, त्यांनी स्वतः आयसीयूमध्ये दाखल केल्याच्या दाव्याला अफवा असल्याचे म्हटले होते. नंतर प्रकृती खालावल्याने त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनावर उद्योग, राजकीय, सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठितांनी शोक व्यक्त केला. संजय राऊत म्हणाले, ‘रतन टाटा उद्योगपती नव्हते तर या देशाचे आधारस्तंभ होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून देशाचा औद्योगिक विकास देशाला मिळालेला रोजगार देशाला मिळालेली प्रतिष्ठा या सर्वांमागे टाटांचं योगदान आहे. टाटा हे असे व्यक्तिमत्व आहे की, ते घराघरात बसले आहे’.
तसेच देश हळहळत आहे त्याचं कारण असं आहे की, टाटा यांनी आपल्याला भरपूर दिले आहे. उद्योगपतींना प्रॉफिट आणि लॉस हेच माहित आहे. टाटा हे कमालीचे देशभक्त होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचं योगदान आहे. सामाजिक लढ्यात त्यांचे योगदान आहे. मुंबईसारखं शहर घडवण्यात देखील त्यांचे योगदान आहे, याची इतिहासाला नोंद घ्यावी लागणार आहे.
कोरोना काळात दिल्या हजारो कोटींच्या देणग्या
‘आज उद्योगपतींची नावे घेतली तर त्यांच्यासाठी देश हा लुटण्याचा साधन आहे. पण टाटांसाठी देश एक निर्मितीचा साधन होतं. त्यांनी देश घडवला. टाटा यांनी कोरोना काळात आमची किती काळजी घेतली हे आम्हाला माहीत आहे. सर्वांत आधी कोरोनाशी लढण्यासाठी देणगी हजारो कोटी देण्यासाठी टाटा हे पुढे होते. टाटांनी फक्त माणसांचे हॉस्पिटल निर्माण केले नाही तर टाटांनी प्राणी, पक्षी, अनाथांसाठी आपला खजिना रिकाम केला’, असेही त्यांनी म्हटले आहे.