मॉस्को : रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर रशियावर पाश्चात्य देशातील अनेकांनी आर्थिक प्रतिबंध घातले आहेत. तर अनेक कंपन्यांनी आपले रशियातील व्यवसायातून काढता पाय घेतला आहे. १३ मार्चपासून मॅकडॉनल्ड्सनेही रशियातील ८५० रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर “द लास्ट बर्गर” हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.
[read_also content=”युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी वाढविले जखमी सैनिकांचे मनोबल, थेट रुग्णालयात जाऊन केली विचारपूस, हिरो ऑफ युक्रेन पुरस्कार देऊन काढल्या सेल्फी https://www.navarashtra.com/latest-news/russia-ukraine-war/president-of-ukraine-boosts-morale-of-wounded-soldiers-goes-straight-to-hospital-for-questioning-nraa-254570.html”]
अनेक इंटरनॅशनल फूट चेन्सच्या शाखा रशियात बंद
रशियाने युक्रेनवरील युद्ध सुरुच ठेवल्याने हा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती मॅक़डोनाल्ड्सचे सीईओ क्रिस केम्पकिंक्सी यांनी दिली आहे. त्यामुळे, कंपनीचे रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, बंद झालेले मॅकडी हा पहिलाच इंटरनॅशनल ब्रँड नाही. यापूर्वी फूड चेनमध्ये नावाजलेले स्टार बक्स, कोका कोला, पेप्सिको, केएफसी, बर्गर किंग यांनीही रशियातील आपल्या शाखा बंद केल्या आहेत. तर, फूड चेनच्या व्यतिरिक्त एक्सॉन मोबाईल, जनरल इलेक्ट्रिक, नेटफ्लिक्ससह अनेक कंपन्यांनी रशियातील आपले कामकाज बंद केले आहे.