On Occasion of Prime Minister Narendra Modi Birthday : मुळशी तालुक्यातील पिरंगुटमधील साईश सुभाष दुधाणेने विद्यार्थ्यांच्या सायकल रॅलीत सुवर्णपदक पटकाविले आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते साईशला सायकल भेट देण्यात आली.
सायकल रॅलीचे आयोजन
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुण्यात शालेय विद्यार्थ्यांच्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डेक्कन जिमखान येथील धर्मवीर संभाजी महाराज पुतळा अशी सायकल रॅली निघाली. या रॅली पूर्ण केल्याबद्दल साईशला सुवर्णपदक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते सत्कार
कोथरूडमधून रॅली निघण्यापूर्वी अभिनव शाळेत 8 वीत शिकणार्या साईश दुधाणे याला आदर्श विद्यार्थी असल्याने केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते सायकल भेट देण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या संयोजिका खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी व स्कायडायव्हर शीतल महाजन उपस्थित होत्या. भेट दिलेल्या सायकलवरूनही रॅली पूर्ण करीत साईशने सुवर्णपदकाचे बक्षिस प्राप्त केले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे पिरंगुट पंचक्रोशीत कौतुक होत आहे.