३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त;७२ फिक्स पॉईंट, १३ ठिकाणी असणार नाकाबंदी
सोलापूर शरहात ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तीन पोलीस उपायुक्त, चार सहाय्यक पोलीस आयुक्त, १७ पोलीस निरीक्षक, ४१ पोलीस उपनिरीक्षक तसेच ७३५ पोलीस अंमलदारांची करडी नजर असणार आहे. तर शहरात ७२ ठिकाणी फिक्स पॉईंट आणि १३ ठिकाणी नाकाबंदी पॉईंट उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे या दिवशी धिंगाणा घालणाऱ्या आणि अवैध गोष्टींना चाप बसणार आहे.
पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; बाणेरमध्ये पादचारी महिलेचे मंगळसूत्र चोरले
पोलीस प्रशासनाकडून ६ स्ट्रायकिंग फोर्स तयार करण्यात आला आहे. ४ आरसीपी पथके तैनात करण्यात आले आहेत. त्याप्रमाणेच शहरांमध्ये गस्त घालण्यासाठी गुन्हे शाखेची एकूण ६ पथके असणार आहेत. मुलींच्या रक्षणासाठी दामिनी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये पीसीआर मोबाईल, बीट मार्शल यांची सतत पेट्रोलिंग असणार आहे. का बरोबरच ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने गोपनीय शाखेची स्वतंत्र साध्या विषयातील गस्त सुद्धा तैनात असणार आहे.
दहा हजारांची लाच घेणं भोवलं; तलाठ्यासह दोघांना रंगेहात पकडले
या दिवशी मद्य प्राशन करून वाहन चालविणे, ट्रिपल सीट मोटरसायकल चालवणे, फटाके फोडणे, सायलेन्सर काढून गाडी चालविणे, मोठ्याने आरडाओरडा करत गाडी चालविणे अशी कृत्य करणाऱ्या वर पोलिसांकडून कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर हा दिवस साजरा करताना लोक विशेषता तरुण तरुणी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करतात. उत्सवात तरुण मुले मुली रात्रीच्या वेळी रस्त्यावरून पायी तसेच वाहनावर गटागटाने रत असल्याने या दिवशी नववर्षाचे स्वागत करणारे अति उत्साही तसेच काही जणांकडून मध्ये प्राशन करून वेगाने वाहन चालविणाऱ्या लोकांमुळे इतरांना त्रास होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन ३१ डिसेंबर आनंदामध्ये साजरा करावा असे आवाहन पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पादचारी महिलांकडील दागिने चोरुन नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पादचाऱ्यांकडील मोबाइल संच चोरून नेण्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशातचं आता पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख ४० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना बाणेर भागात घडली आहे. याप्रकरणी ज्येष्ठ महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ज्येष्ठ महिला बाणेर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या गुरुवारी (२६ डिसेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास बाणेर परिसरातून निघाल्या होत्या. काॅर्नर स्टोन इमारतीजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक थिटे अधिक तपास करत आहेत.