सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांच्या चांगल्या कामाच्या पाठीशी सोलापूर जिल्हा परिषद असणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
दिलीप स्वामी पुढे म्हणाले, अमेरिकेतील संशोधनासाठी शिष्यवृत्ती त्यांना मिळाल्याचे कळते आहे. परदेश जाण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना जे प्रशासकीय कागदपत्रांची आवश्यकता आहे ती पूर्तता झाल्यास त्यांना परदेश दौर्यास परवानगी मिळेल सोमवारपर्यंत पूर्तता पूर्ण करण्याचे सूचित करण्यात आले आहे. मिस कम्युनिकेशन झाल्यामुळे डिसले गुरुजींचा चर्चेचा विषय झाला. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानुसार सोमवारपर्यंत सर्व प्रशासकीय कामकाज पूर्ण करण्यात येईल आणि त्यांना परदेश दौऱ्यासाठी परवानगी देण्यात येईल, असे दिलीप स्वामी म्हणाले.
दरम्यान, गैरहजर विषयक डिसले गुरुजी यांच्याविरोधातील तक्रार असल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने चौकशी अहवाल तयार केल्याची माहिती समोर आली आहे. हा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. अद्यापपर्यंत हा अहवाल माझ्यापर्यंत आला नाही. अहवालाची बारीक-सारीक पडताळणी करण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले.