31 डिसेंबर म्हणजे सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आणि येणाऱ्या वर्षाच उत्साहात स्वागत करणं. यामध्ये तरुणाई सर्वात पुढे असते. नुकतेच देशभरात तरुणाईने नववर्षाचं स्वागत जल्लोषात केलं. या काळात स्विगीचे एक ट्वीट चर्चेत होतं, ज्यामध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला स्विगी इंस्टामार्टने मोठ्या प्रमाणात कंडोमची डिलिव्हरी केली असल्याचे नमूद करण्यता आलंय. स्विगीचं हे ट्विट सध्या प्रंचड व्हायरल होत असून लोकं मजेशीर प्रतिक्रीया देताना दिसत आहेत.
नववर्षाच्या पार्टीसाठी खाण्यापिण्याचे सामान, खाद्यपदार्थ ग्राहकांनी मागवल्याच ट्विट स्विगीने केलं असून त्यासोबतच कंडोमची ऑर्डर दिल्याचं ट्विटमध्ये म्हण्टलंय. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करत लिहिले की होते की, ‘आतापर्यंत @DurexIndia कंडोमची 2757 पॅकेट @SwiggyInstamart द्वारे वितरित केली गेली आहेत. कृपया हा आकडा 6969 पर्यंत घेऊन जाण्यासाठी अजून 4212 ऑर्डर करा जेणेकरुन आम्ही सर्वजण ‘नाईस’ म्हणू शकू.’
2757 packets of @DurexIndia condoms delivered by @SwiggyInstamart so far. please order 4212 more to make it 6969, so we can all say “nice”
— Swiggy (@Swiggy) December 31, 2022
त्यावर ड्यूरेक्सने अतिशय मजेशीर प्रतिक्रिया देत म्हण्टलं की, ‘इतक्या मोठ्या प्रमाणात कंडोम डिलिव्हर केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला माहित आहे की, हे 2757 चांगल्या प्रमाणात व्यतीत करत आहेत. आम्हाला आशा आहे की ते उद्या सकाळी एकत्र कॉफी ऑर्डर करतील.’ आता ड्यूरेक्सचे हे ट्वीट व्हायरल होत आहे.
Thank you for ‘delivering’ them O’s. We know atleast 2757 are having a banging new year 😉
P.s: We hope they order coffee together tomorrow morning
— Durex India (@DurexIndia) December 31, 2022