: IPL 2025 पूर्वी भुवनेश्वर कुमारवर यूपीची मोठी जबाबदारी; रिंकू सिंगलाही मिळाली संधी
Bhuvneshwar Kumar : IPL 2025 चा मेगा लिलाव जवळ आला आहे. त्याअगोदर मुश्ताक अली ट्रॉफी 2024 सुरू होत आहे. IPL लिलावापूर्वी प्रत्येक खेळाडू आपले वर्चस्व दाखवत आहे. याअगोदर मुश्ताक अली ट्रॉफी 2024 ची घोषणा झाली आहे. उत्तर प्रदेशने आपला संघ जाहीर केला आहे. गेल्या वर्षी करण शर्माची यूपीच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, यावेळी भुवेश्वर कुमारवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुंबईने अजिंक्य रहाणेला बनवले कर्णधार
या अगोदर मुंबईच्या संघाने आपला संघ जाहीर केला आहे. मुंबईने अजिंक्य रहाणेला कर्णधार बनवले आहे. मुंबईने आपल्या संघात अजिंक्य रहाणेला संधी देत थेट या स्पर्धेकरिता कर्णधार बनवले आहे. 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेसाठी मुंबईचा कर्णधारपद देण्यात आले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अधिकाऱ्याने IANS या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.
उत्तर प्रदेशची महत्त्वाची जबाबदारी भुवनेश्वर कुमारवर
उत्तर प्रदेशच्या संघाचे भुवनेश्वर कुमार नेतृत्व करणार आहे, परंतु ध्रुव जुरेल यावेळी संघाचा भाग नसणार आहे. जो बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. कर्णधार भुवनेश्वर कुमार बद्दल बोलायचे तर, तो शेवटचा यूपी टी-20 लीगमध्ये खेळताना दिसला होता, जिथे तो 11 सामन्यांमध्ये फक्त 7 विकेट घेऊ शकला होता. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023 मध्ये उत्तर प्रदेशने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती, जिथे त्यांना पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत पंजाबकडून 5 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. जर आपण यूपी संघाचे मूल्यांकन केले तर भुवनेश्वर व्यतिरिक्त चार खेळाडूंनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
भुवनेश्वर कुमार सनरायझर्स हैद्राबादकडून खेळलाय
भुवनेश्वर कुमार 2014 ते 2024 पर्यंत सनरायझर्स हैदराबादकडून खेळला, परंतु हैदराबादने त्याला आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी सोडले. त्याने आतापर्यंत 176 आयपीएल सामन्यांमध्ये 181 विकेट घेतल्या आहेत, त्यामुळे अनेक फ्रँचायझी त्याच्यावर बोली लावताना दिसणार आहेत. एसआरएचने 5 खेळाडूंना कायम ठेवून एकूण 75 कोटी रुपये खर्च केले आहेत. पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी आणि हेनरिक क्लासेन अशी कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे आहेत.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी यूपीचा संभावित संघ : भुवनेश्वर कुमार (कर्णधार), माधव कौशिक (उपकर्णधार), करण शर्मा, रिंकू सिंग, नितीश राणा, समीर रिझवी, स्वस्तिक चिकारा, प्रियम गर्ग, आर्यन जुयाल, आदित्य शर्मा, पियुष चावला, विप्रराज निगम, कार्तिकेय जैस्वाल, शिवम शर्मा, यश दयाल, मोहसीन खान, आकिब खान, शिवम मावी, विनीत पनवार.
हेही वाचा : अजिंक्य रहाणेसाठी आनंदाची बातमी; मुंबईच्या संघाची मोठी जबाबदारी खांद्यावर; श्रेयस अय्यरलादेखील संधी
मुंबईला बनवले रणजी चॅम्पियन
तर दुसरीकडे मुंबईचा संघ हा अजिंक्य रहाणेने नुकतेच त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला रणजी चॅम्पियन बनवले. आता त्याला त्याच्या कामगिरीचे बक्षीसही मिळाले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबईचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपवले आहे. आयपीएल 2025 पूर्वी रहाणेसाठी ही मोठी संधी आहे. मुश्ताक अली ट्रॉफी 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल. या स्पर्धेत रहाणेची कामगिरी चांगली राहिली, तर आयपीएल लिलावात तो विकला जाईल.
हेही वाचा : प्रो कबड्डीत यु मुम्बाची विजयी आगेकूच कायम; परवेश भैन्सवालने केलेली अव्वल पकड ठरली निर्णायक