नवी दिल्ली- टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या पदरी फक्त अपयश पडलं आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड टीमकडून पराभव स्वीकारल्यानंतर आता सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी धूसर झाली आहे. अशा स्थितीत क्रिकेट पॅन्स क्रिकेटर्सना ट्रोल करतायेत. पम या परिस्थितीला जबाबदार कोण टीम इंडिया की बीसीसीआय, हा प्रश्न आहे. खरंतर टीम इंडियाचे शेड्यूल पाहिले तर या सगळ्याला बीसीसीआयलाच जबाबदार धरावं लागेल, अशी परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांत टीम इंडियाचे शेड्यूलच असे होते, की टी-२० वर्ल्ड कप टुर्नामेंट सुरु होण्यापूर्वी टीममधील सर्वच मेंबर्स बऱ्यापैकी थकलेलेच होते.
गेल्या वर्षी कोरोनामुळे मार्च ते सप्टेंबर या काळात टीम इंडियाची एकही सीरिज झाली नाही. आयपेलही कॅन्सल झाले. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी बीसीसीआयने सप्टेंबरपासून क्रिकेट सीरिजचा धडाकाच लावला, तो अद्यापपर्यंत संपलेला नाही. सप्टेंबर २०२० पासून टीम इंडिया सातत्याने मैदानात आहे. दुबईत सप्टेंबर २०२०मध्ये आयपीएल सिझन झाला, त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौरा, त्यानंतर इंग्लंड संघासोबत भारतात मॅचेस झाल्या. ते सपंल्यावर लगेच आयपीएल २०२१ च्या पहिल्या मॅचेस झाल्या. वाढत्या कोरोनामुळे आयपीएल स्थगित करण्यात आले. त्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपची फआयनल खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये गेली. त्यानंतर इंग्लंडमध्येच पाच टेस्टची सिरीज झाली. याच काळातच टीम इंडियाची टीम बी श्रीलंकेला रवाना झाली.
इंग्लंडची पाचवी टेस्ट कोरोनामुळे रद्द झाली, तर लगेचच टीम इंडिया आयपीएलच्या स्थगितीनंतरच्या मॅचेस खेळण्यासाठी दुबईत दाखल झाली. प्रतिस्पर्धी आणि फ्रेंचाईसच्या दबावात आयपीएल पार पडल्यावर दोनच दिवसात टीम इंडिया वर्ल्ड कप टी-२०च्या रणांगणात उतरली.
एकावेळी हे सगळं वाचणंही थकवणार आहे, त्यामुळे प्रत्यक्ष टीममधील प्लेअर्सचं काय झालं असेल, याचा विचारच केलेला बरा. थोडक्यात गेल्य १३ महिन्यात टीमने आयपेलचे दोन सिझन आणि ७६ आंतरराष्ट्रीय मॅचेस खेळल्या आहेत, त्याचबरोबर काही प्लेअर्स देशांतर्गत क्रिकेट मॅचेसही खेळले आहेत.
आयपीएलच्या शेवटच्या राऊंडी सुरुवात १० ऑक्टोबरला झाली. यात विराट कोहली, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, ऋषभ पंत, वरुण चक्रवर्ती आणि आर अश्विन सामील होते. ८ ऑक्टोबरला मुंबई इंडियन्सची शेवटची मॅच झाली, त्यात रोहित शर्मा, जसप्रित बुमराह यासह सहा प्लेअर्स होते. म्हणजेच आठवडाभरावर वर्ल्ड कप असताना पूर्ण म आयपीएल खेळत होती.
अति क्रिकेटसोबत बायो बबल आणि क्वारंटाईनलाही प्लेअर्सना सामोरे जावे लागले. या काळात त्यांना हॉटेल आणि ग्राऊंड सोडल्यास कुठेही जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्यांना मानसिक थकवा आला नसेल, तरच नवल. बीसीसीआयने टीम इंडियातील प्लेअर्सची स्थिती सर्कसच्या पिंजऱ्यातील प्राण्यांसारखी केली होती. याचा परिणाम टीम इंडियाच्या शारिरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर झाला, त्याचा परिणाम आता टी-२० वर्ल्ड कप मॅचेसमध्ये पाहायला मिळतो आहे.
आयपीएल हा क्रिडा प्रकार शारिरिक आणि मानसिक स्वास्थ्याची कसोटी पाहतो. त्यातच सातत्याने क्रिकेट खेळल्याने प्लेअर्स थकून गेले होते. आयपीएल -२ नंतर टीम इंडियाला तीन आठवड्यांच्या ब्रेकची गरज होती. ती न मिळाल्याने क्रिकेटर्स पूर्णपणे खचले.
बीसीसीआय व्यतिरिक्त इतर क्रिकेट बोर्डाने संयमाने काम केले. गेल्या वर्षी कोरानामुळे मॅचेस झाल्या नाहीत, त्यानंतर इतर बोर्डांनी कमी क्रिकेट खेळण्याला पसंती दिली. इंग्लंडने पाकिस्तान दौरा रद्द करताना, सुरक्षेच्या कारणासह क्रिकेटर्सच्या मानसिक स्वास्थ्याचेही कारण दिले होते. ऑस्ट्रेलियाने द. अफ्रिकेसोबत होणारी सीरिज रद्द केली.
यावर्षी वर्ल्ड कप होणार हे सर्वांना माहित होते. त्यामुळे इतर बोर्डांनी या वर्षी शेवटचा काळ त्यासाठी राखून ठेवला होता. टी-२० वर्ल्ड कपवर त्यांचं लक्ष होतं. बीसीसीआय मात्र आयपीएल यशस्वीपणे पार पाडण्यात गुंतली होती.
मेमध्ये कोरानामुळे आय़पीएल २०२१ स्थगित करण्याचा निर्णय झाला, तचेव्हा बीसीसीआयचे २ हजार कोटींचे नुकसान होणार, अशी चर्चा रंगली होती. त्याची भरपाई करण्यासाठी सप्टेंबरमध्ये आयपीएल फेज २ दुबईत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर आपल्याला टी-२० वर्ल्ड कपचे मिळालेले यजमानपदही ओमान आणि दुबईला देण्यात आले. कोणतेही आर्थिक नुकसान होऊ नये, या नादात बीसीसीआयने टीम इंडियाच्या क्रिकेटर्सना घाण्याच्या बैलासारखे जुंपले आणि त्यांच्याकडून अतिक्रिकेट खेळवून घेतले. त्यामुळेच आजच्या टीम इंडियाच्या स्थितीला बीसीसीआय जबाबदार असल्याचे मानण्यात येत आहे.