Union Information And Broadcasting Minister Prakash Javadekar Says Keeping In Mind The Idea That Peoples Journey Should Be Smooth And Freight Should Be Better Nrms
जनतेचा प्रवास सुखाचा व्हावा आणि मालवाहतूक उत्तमोत्तम व्हावी याचा विचार केंद्रस्थानी ठेवणारे : केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर
देशात आजवर अनेक नेते झाले. आपल्या विशेष कार्यप्रणालीद्वारे या नेत्यांनी लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले. ज्या ज्या वेळी चर्चा झाली त्या त्या वेळी संबंधित नेत्यांच्या कार्याला उजाळा दिला गेला. असेच व्यक्तिमत्त्व नितीन गडकरी यांच्या रूपात केंद्र सरकारला मिळाले आहे. नितीन गडकरी यांनी राजकारणाची सुरुवात उपराजधानी नागपूर येथून केली.
राज्यातील रस्ते वाहतुकीतील समस्यांचा सखोल अभ्यास करून रस्ते बांधकामात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली कामगिरी ही सुवर्ण नोंद ठरली आहे. जनतेचा प्रवास सुखाचा व्हावा तसेच मालवाहतूक उत्तमोत्तम व्हावी याचा विचार केंद्रस्थानी ठेवून आजच्या घडीला राज्यात अनेक महामार्गांचे कामकाज झाले आहे. हे काम करताना नितीन गडकरी यांनी एकना अनेक सरस योजना राबवल्या आिण आज लोकांचा प्रवास आनंदाने होत आहे. याचे सर्वश्री श्रेय नितीन गडकरी यांनाच जाते.
देशात आजवर अनेक नेते झाले. आपल्या विशेष कार्यप्रणालीद्वारे या नेत्यांनी लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले. ज्या ज्या वेळी चर्चा झाली त्या त्या वेळी संबंधित नेत्यांच्या कार्याला उजाळा दिला गेला. असेच व्यक्तिमत्त्व नितीन गडकरी यांच्या रूपात केंद्र सरकारला मिळाले आहे. नितीन गडकरी यांनी राजकारणाची सुरुवात उपराजधानी नागपूर येथून केली.
तत्कालीन भारतीय युवा मोर्च्याचा अध्यक्षपदी नितीन गडकरी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी चोखपणे युवांचे नेतृत्व केले. नेतृत्व क्षमता पाहून त्यांच्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. राजकारणात यशस्वी होण्यासाठी लोकपि्रयता गरजेची असते. त्यासाठी लोकसेवा केली पाहिजे, हे गडकरी यांना अवगत असल्याने त्यांनी नागपुरात आपल्या कामांमुळे लोकांच्या मनी आधाराचे स्थान मिळवले, हे १९८७-८८ साली प्रसिद्ध झाले. या काळात गंगाधर फडणवीस यांचे निधन झाले. त्याच दरम्यान नागपुरात निवडणुकांचे बिगुल वाजले.
या निवडणुकांमध्ये नितीन गडकरी भरघोस मतांनी निवडून आले. ‘गडकरी बोले तथा नागपूर चाले’ अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. नितीन गडकरी यांची वाढती लोकपि्रयता पाहून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर आणखी जबाबदारी सोपवली. पूर्व व पश्िचम विदर्भात पक्ष वाढवण्याची जबाबदारी नितीन गडकरी यांना देण्यात आली. ही जबाबदारी त्यांनी उत्तमरीत्या पार पाडली. जशी लोकप्रियता वाढत गेली तशी गडकरी यांच्यावर जबाबदारी वाढत गेली अन् ते महाराष्ट्र प्रदेश महासचिव व कालांतराने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी विराजमान झाले. शहराध्यक्ष ते प्रदेशाध्यक्ष या काळात त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद ठरले. सत्ता असो वा नसो लोकहित कसे जपायचे हे त्या काळात नितीन गडकरी यांनी दाखवून दिले.
दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात युती सरकारला मतदारराजाने नेतृत्व करण्याची संधी दिली. मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी प्रत्येक मंत्री पूर्ण क्षमतेने कार्यरत होता. मात्र या सर्वांमध्ये नितीन गडकरी यांचे कामकाज विशेष उल्लेखनीय ठरले. त्यांनी वाहतुकी संदर्भात येणाऱ्या अडथळा व सुरक्षित प्रवासासाठी उपाययोजना म्हणून राज्यात पक्के रस्ते, उड्डाणपूल बांधले. तसेच मुंबई व पुणे शहरात लोकांची रहदारी लक्षात घेऊन या दोन्ही शहरांत येण्या-जाण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्ग तयार करण्यावर शिक्कामोर्तब झाले. या महामार्गाची घोषणा झाली. पण त्यासाठी सरकारच्या तिजोरीत त्याकाळी पैसा नव्हता.
कुठल्याही परिसि्थतीत एक्सप्रेस मार्ग तयार करायचा, हा निश्चय मनी बाळगलेल्या नितीन गडकरी यांनी टेंडर काढण्याचे ठरवले. जेवढी गरज होती त्याहून अिधक पैसा या एक्सप्रेस मार्गासाठी जमा झाला. एक्सप्रेसच्या बांधकामातील उल्लेखनीय बाब म्हणजे प्रत्यके २० किलोमीटरसाठी वेगवेगळ्या कंत्राटदाराला बांधकाम करण्यास देण्यात आले. तसेच जो कंत्राटदार नियोजित वेळेपूर्वी रस्त्याचे काम दर्जेदाररीत्या पूर्ण करेल, त्याला बोनस देण्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली.
इतकेच नव्हे तर वेळेवर काम करा आणि बिलाचे पैसे घ्या, विलंब लावल्यास दंड आकारला जाईल, असे जाहीर करून नितीन गडकरी यांनी देशाच्या रस्ते व महामार्ग बांधकामात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. नितीन गडकरी यांच्या या निर्णयामुळे गेल्या २५ वर्षांहून अिधक काळापासून सदर एक्सप्रेस हायवे आजच्या घडी आहे त्याच परिस्थितीत असून, मुंबई-पुणे शहरांचे अंतर अवघ्या साडेतीन-चार तासांचे झाले आहे.
नितीन गडकरी यांच्या याच कार्यक्षमतेमुळे आजही ते केंद्र सरकारमध्ये रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री पदावरून उत्तम धुरा सांभाळत आहेत. पक्ष कोणताही असो लोकहितासाठी जो नेता प्रयत्न करतो त्याच्या कामाला प्राध्यान द्यायचे, कारण लोकप्रतिधी हा लोकसेवक आहे. या स्वभाव गुणांमुळे नितीन गडकरी हे अनेकांसाठी आदर्श ठरत आहेत. अशा लोकनेत्याला उदंड आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य मिळो, हीच वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा!
प्रकाश जावडेकर केंद्रीय मंत्री, माहिती-प्रसारण
Web Title: Union information and broadcasting minister prakash javadekar says keeping in mind the idea that peoples journey should be smooth and freight should be better nrms