मुंबई: लसीकरण मोहिमेला(Vaccination Mission) वेग येण्यासाठी मुंबईतील खासगी सोसायट्यांच्या परिसरात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. पूर्व उपनगरातील देवनार परिसरात रहेजा एक्रोपोलिस या वसाहतीमध्ये(Vaccination in Society) सुराना रुग्णालयाच्या सहाय्याने या मोहिमेला सुरुवात झाली आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.
[read_also content=”चंद्रकांत पाटलांसह भाजपवाले कोमात आहेत काय ? हसन मुश्रीफ यांनी विरोधकांवर साधला निशाणा https://www.navarashtra.com/latest-news/hasan-mushrif-criticized-chandrakant-patil-and-bjp-for-watching-power-dreams-nrsr-135069.html”]
मुंबई महापालिकेने लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी खासगी सोसायटींच्या आवारात लसीकरण मोहीम राबविण्याची परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर रहेजा एक्रोपोलिस या सोसायटीच्या आवारात लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली. येथील सुमारे ६०० जणांना कोव्हिशिल्डचा पहिला डोस देण्यात आला. सोसायटीतील रहिवासी , घरकाम करणाऱ्या महिला, चालक कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांनी लस टोचून घेतली. यावेळी खासदार राहुल शेवाळे यांनी रहिवाशांशी संवाद साधला. लसीकरणानंतरही खबरदारी घेऊन सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही यावेळी शेवाळे यांनी केले.