सौजन्या - ANI and ravindra.jadeja ....; पाहा रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबाचा राजकीय थाट शस्त्रपूजा, VIDEO
रिवाबा जडेजाची शस्त्रपूजा : दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्रपूजा केली जाते. या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून माता सीतेला मुक्त केले. या दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात. या दिवशी रामाच्या पूजेबरोबरच शस्त्रपूजनही केले जाते. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिने यावेळी तलवारीसह बंदुकीचे पूजन केले. डोक्यावर पदर ठेवून रिवाबा जडेजाने बंदूक आणि तलवारीची पूजा केली. यानंतर त्यांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छाही दिल्या. पूजेनंतर रिवाबा जडेजा म्हणाली, आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मला शस्त्रपूजा करण्याची संधी मिळाली. माझ्याकडून सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
रिवाबाची दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्रपूजा
#WATCH | Jamnagar, Gujarat: BJP MLA Rivaba Jadeja performs Shastra Puja, on the occasion of #VijayaDashmi pic.twitter.com/PShfu9a1ln
— ANI (@ANI) October 12, 2024
जडेजाला तलवार फिरवण्याचा शौक
रवींद्र जडेजा हा भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू आहे. त्याला तलवार चालवण्याची खूप आवड आहे. सामन्यात शतक झळकावल्यानंतर तो तलवारीप्रमाणे क्रिकेटची बॅट फिरवतो. यासोबतच तो पन्नास धावा करूनही असेच काहीसे करतो. तलवार चालवणे ही जडेजाची सिग्नेचर स्टाइल बनली आहे. टी-२० विश्वचषकानंतर त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. पण तरीही तो एकदिवसीय आणि कसोटीत संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे.
रिवाबा जडेजा ही भाजपची आमदार
रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा या आमदार आहेत. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जामनगर उत्तरमधून भाजपच्या तिकिटावर अर्ज दाखल केला होता. तिथे त्या जिंकल्या आणि आमदार झाल्या. त्यांनी गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. रिवाबाने महिलांना मदत करण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी श्री मातृशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट नावाची एनजीओ सुरू केली आहे.