Photo Credit- Social Media कुठे आहे वाल्मिक कराड? हे होतं शेवटचं लोकेशन
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग झाल्यानंतर बीड जिल्ह्यात आतापर्यंत अनेकजणांच्या चौकशी करण्यात आल्या आहेत. पण या प्रकरणातलमा सर्वात मोठा आरोपी वाल्मिक कराड सध्या फरार आहे. अशातच सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी सकाळपर्यंत तो बीड पोलिसांसमोर आत्मसमपर्ण करेल, अशी चर्च बीडमध्ये सुरू झाली आहे. पण हा वाल्मीक कराड महाराष्ट्रात आहे की महाराष्ट्राच्या बाहेर आहे. याबाबत पोलीस त्याचा शोध घेत असतानाच मोठी अपडेट समोर आली आहे. वाल्मिक कराडचे शेवटचे लोकेशन समोर आले आहे.
9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार आहे. वाल्मिक कराडवर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप आहे. त्यानंतर त्याने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून आपला फोटो अपलोड केला आहे. बीडमध्ये झालेल्या या प्रकरणानंतर वाल्मिक कराड आपल्या उज्जैनला पोहचला होता. त्याने उज्जैनच्या महाकाल मंदिराबाहेर काढलेला फोटोही त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारीही त्याच्यासोबत होते. दरम्यान, या प्रकऱणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर वाल्मिक कराडची बँक खाती गोठवण्यात आली आहे.
Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कधी सुरू होणार? काय ठरली
दरम्यान, रविवारी वाल्मिक कराड याची पत्नी मंजिली कराड यांची सीआयडी पथकाने केज पोलिस ठाण्यात एक तास चौकशी केली. आतापर्यंत त्यांची तिसऱ्यांदा चौकशी करण्यात आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण आणि वाल्मिक कराड यांचे अंगरक्षक यांची देखील चौकशी करण्यात आली. तसेच चार ते पाच महिलांना बीड शहर पोलीस ठाण्यात सीआयडीने चौकशीसाठी बोलवले होते. तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली. अद्याप त्यांची नावे समोर आली नसली, तरी खंडणी प्रकरणातील आरोपीच्या जवळचे असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
दरम्यान, या प्रकरणात विरोधकांकडूनही धनंजय मुंडेंवर आरोप होऊ लागले आहेत. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्यामुळेच त्याचावर कारवाई होत नाहीये, असा आरोप केला जा आहे. वाल्मिक कराडवर पवनचक्की मालकाकडून 2 कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आल्याची त्यामुळेच या प्रकऱणात कराडवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
३० दिवस रिकाम्या पोटी करा आल्याच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील आश्चर्यकारक
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे आहे. सीआयडीचे बड्या अधिकाऱ्यांनी बीडमध्ये तळ ठोकला आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सीआयडीच्या 9 पथकांमधील 150 पोलीस कर्मचारी काम करत आहेत. याशिवाय राज्य सरकारच्या आदेशानंतर त्या सर्वांचीबँक खाती गोठवण्यात आली आहे, इतकेच नव्हे तर त्यांचे पासपोर्टही रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे देशाबाहेर पळून जाण्याचा आरोपींचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे आता वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांना कधी अटक करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.