बाळ जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी सटवाईची पूजा केली जाते सटवाई ही बाळाचे भविष्य लिहिते असं जुने लोक म्हणतात. बाळ जन्माला आल्यानंतर सटवाई बाळाचे रक्षण करते असेही म्हणतात. यामागील माहिती व पौराणिक कथा जाणून घेऊया.
सटवाईची पूजा बाथरूममध्ये केली जाते यानंतर एक रिकामा कागद व पेन या पूजेमध्ये ठेवले जाते. सटवाईची पूजा हा जरी वैदिक संस्कार नसला तरी बहुतेक हिंदू लोक बाळ जन्मल्यानंतर पाचव्या दिवशी सटवाईची पूजा करतात बाळाच्या जीवनातील हा पहिलाच लौकिक विधी असतो.
[read_also content=”या ठिकाणी लपवले आहे कर्णाची कवचकुंडल; आश्चर्यकारक आहे सत्य! https://www.navarashtra.com/latest-news/karnas-kawach-kundal-found-hear-nrng-164306.html”]
असे म्हणतात या दिवशी सटवाई कोणत्याही रूपाने येऊन बाळाच्या कपाळावर भविष्य लिहिते त्यासाठीच एक कागद व पेन पूजेच्या ठिकाणी ठेवतात याच वेळेस बाळाच्या लगाठीची रेषा आखली जाते. जेव्हा बाळमधूनच झोपेत हसते तेव्हा लोक म्हणतात की सटवाई येऊन बाळाला हसवत आहे.
सटवाई बद्दलची एक पौराणिक कथा आहे रोज रात्री आपली आई कुठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला तिने आईला याबाबत विचारले तेव्हा तिने तो विषय टाळला परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईलाज झाला मी जन्मलेल्या मुलांचे भविष्य लिहिण्यासाठी जाते असे उत्तर दिले.
तू दुसर्यांचे भविष्य लिहितेस मग माझे भविष्य काय आहे सटवाई म्हणते तुझे लग्न तुझ्या पोटी जन्मलेल्या मुलाशीच होईल हे ऐकल्यानंतर लग्नच न करण्याचा निर्णय ती मुलगी घेते काही दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदीकिनारी पाणी पिण्यासाठी येतो योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून थुंकलेले पाणी तिच्या पिण्यात येते त्यामुळे तिला दिवस जातात कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ती जंगलात टाकून देते तू दुसऱ्यांचे भविष्य लिहितेस मग माझे भविष्य काय आहे सटवाई म्हणते तुझे लग्न तुझ्या पोटी जन्मलेल्या मुलाशीच होईल हे ऐकल्यानंतर लग्नच न करण्याचा निर्णय ती मुलगी घेते काही दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदीकिनारी पाणी पिण्यासाठी येतो योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून थुंकलेले पाणी तिच्या पिण्यात येते त्यामुळे तिला दिवस जातात कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ती जंगलात टाकून देते.
ते मूल एका राजाच्या हाती लागते तो त्या मुलाचे संगोपन व पालन पोषण करतो तो मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एके दिवशी जंगलात जातो तिथे त्याला माहीत नसलेली त्याची आई भेटते तो तिच्या प्रेमात पडतो आपणास झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आपल्या आईचे म्हणजेच सटवाईचे भविष्य खोटे ठरेल असे समजून ती त्या युवकाच्या प्रेमाला प्रतिसाद देते.
दोघांचे लग्न ठरते परंतु मूल टाकताना त्याच्याभोवती गुंडाळलेले कपडे युवकाने जपून ठेवलेले असते ते कापड पाहिल्यानंतर आपले आपल्याच मुलाशी लग्न ठरल्याचे तिच्या लक्षात आले थोडक्यात सटवाई सांगत असलेले भविष्य कधीही खोटे ठरत नाही असा या कथेचा आश्रय आहे.
(पौराणिक कथेच्या आधारावर ही माहिती देण्यात आलेली आहे. याचा अंधश्रद्धेशी संबंध नाही)