नवी दिल्ली- कोरोनाची तिसरी लाट तोंडावर सल्याची चर्चा सुरु आहे. अनेक देशांना पुन्हा कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसतो आहे. देशात लसीकरणाची आकडेवारी १०० कोटींवर पोहचली असली, तरी अद्याप लहान मुलांच्या लसीकरणाचं का, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. ऑग्सटमध्ये कॅडिलाच्या डायकोव-डी या लशीला मुलांसाठी मंजुरी मिळाली होती. मात्र आजही सरकारी किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये ही लस उपलब्ध नाही. तसचं कोव्हॅक्सिनलाही विषय तज्ज्ञ समितीने आपतकालीन वापरास मंजुरी दिली असली तरी अद्याप ड्र्गज जनरल कंट्रोलर ऑफ इंडियाची मंजुरी मिळणे अद्याप बाकी आहे.
सरकारने कँडिलाच्या जायकोव-डी लशीला लहान मुलांसाठी परवानगी दिली आहे. ही लस १२ वर्षांवरील सर्वांसाठी उपयुक्त आहे. ऑगस्टमध्ये परवानगी मिळाली असली तरी अद्याप लस उपलब्ध नाही. कंपनी या लशीची किंमत १९०० रुपये ठेवण्याच्या तयारीत आहे, त्याला सरकारचा विरोध आहे. कमी किमतीत लस उपलब्ध व्हावी, अशी सरकारची इच्छा आहे. यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. या लसीच्या तिसऱ्या चाचणीचा निष्कर्षही अद्याप बाकी आहे, तसेच लशींची उपलब्धता हेही एक कारण आहे. कंपनीने एका महिन्याला १ कोटी लशी पलब्ध करुन देण्याची खात्री दिली आहे. मात्र ही संख्या अपुरी आहे. उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. देशात सुमारे ३० कोटी लहानग्यांना लशींची आवश्यता आहे.
तर कोव्हॅक्सिनलाही मुलांसाठी आपतकालीन वापरास मंजरी मिळालेली आहे. मात्र अजून एका विभागाची मंजुरी बाकी आहे. २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना ही लस देता येणार आहे. कोव्हॅक्सीनच्या लशींची उपलब्धता हाही मुद्दा आहे. आत्तापर्यंत कोव्हॅक्सिनने उत्पदानाचे जे आश्वासन दिले होते, ते ती पूर्ण करु शकलेली नाही. सप्टेंबरपर्यंत कंपनी ३.५ कोटी लसींचे उत्पादन करते आहे, मात्र आश्वासन ५.५ कोटींचे दिले होते. सुप्रीम कोर्टातही कोव्हॅक्सीनने सुरुवातील दरमहा १० कोटी आणि नंतर ८ कोटी उत्पादन करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र कंपनी ते पूर्म करु शकलेली नाही. कच्च्या मालाचा तुटवडा आणि साठवणूक क्षमतेचा अभाव अशी कारणे पुढे करण्यात येत आहेत.
मोठ्यांना देण्यात येत असलेली कोव्हॅक्स्न लसच लहान मुलांना देण्यात येईल, अशी शक्यता आहे. भारत बायोटेक कंपनीच्या सूत्रांनुसार, मोठ्यांना देण्यात येणारी लस ५२५ मुलांना चाचणीत देण्यात आली होती, २८ दिवसांत या लसीचे दोन डोस देण्यात आले. चाचणीचा अंतिम अहवाल ऑक्टोबरमध्ये सरकारला सुपूर्त करण्यात आला आहे. चाचणीत मोठ्यांची लस लहान मुलांवर परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंजुरी मिळालेल्या जायकोव डीचे तीन डोस मुलांना द्यावे लागणार आहेत. वर्षभरात कंपनीने २४ कोटी लशींचे उत्पादन केले तरी वर्षभरात केवळ ८ कोटी मुलांचे लसीकरण होईल. तसाच विचार कोव्हॅक्सिनचा केला तर एका वर्षात १६ कोटी लशींची निर्मिती होईल, त्यातून ८ कोटी मुलांचे लसीकरण होईल. दोन्ही कंपन्यांच्या लसींचा विचार केला तर वर्षभरात केवळ १६ कोटी मुलांचे लसीकरण शक्य होणार आहे.
देशाच्या लोकसंख्येत ४० टक्के लोकसंख्या ही १८ वर्षांखालील आहे. म्हणजेच ५५ ते ६० कोटी मुलांच्या लोकसंख्येत १६ कोटी जणांचे लसीकरण म्हणजे केवळ २५ टक्केच मुलांचे लसीकरण वर्षभरात शक्य आहे.
नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये मुलांचे लसीकरण सुरु होण्याची शक्यता आहे. आजारी असलेल्या मुलांचे पहिल्यांदां लसीकरण करण्याचा सरकारचा विचार आहे, मात्र त्यासाठी डॉक्टरांच्या रिपोर्टसची गरज लागेल. यावर लवकरच निर्णय़ होणे अपेक्षित आहे. आत्तापर्यंत ज्याही देशांत मुलांचे लसीकरण झाले आहे, तिथे मुलांवर कोणतेही गंभीर परिणाम झालेले नाहीत. मोठ्यांप्रमाणेच सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यासारखे साईड इफेक्ट लस दिल्यानंतर मुलांना होण्याची शक्यता आहे.