संजय लीला भन्साळी (Sanjay leela Bhansali) यांचा गंगूबाई काठियावाडी (Gangubai kathiawadi) सिनेमा नुुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाच्यानिमित्ताने भन्साळी यांनी अलिकडेच एका वेबसाईटला मुलाखत दिली. तेव्हा त्यांनी गंगूबाईसह अनेक प्रश्नांवर सडेतोड उत्तर दिली. यावेळी त्यांना सलमान खानबाबत प्रश्न विचारण्यात आला. सलमान (Salman)आणि भन्साळी हे खूप जुने मित्र पण असं असूनही भन्साळींच्या सिनेमात सलमान नसतो. तेव्हा भन्साळी म्हणाले की, “सलमान माझा खूप जवळचा आणि खूप चांगला मित्र आहे. मला त्याच्यासोबत पुन्हा काम करायचे आहे. पद्मावत चित्रपटानंतर मी प्रयत्न करत होतो. पण माणूस म्हणून आपण सर्वजण काळासोबत बदलतो. सलमानही बदलला आहे आणि त्याच्या मते मीही बदललो आहे.”
“सलमान खान आणि माझे नाते आजही तितकेच चांगले आहे. आमच्या दोघांमध्ये आजही संभाषण होतं. त्यामुळे आमच्यात संवाद नाही, आम्ही अनोळखी आहोत, असे काहीही नाही. माझ्या मनात सलमानबद्दल फार आदर आहे. खामोशी या चित्रपटात त्यांनी माझ्यासाठी काम केले. ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये त्याने माझ्यासाठी काम केले होते. सावरियाच्या वेळीही तो माझ्या पाठीशी उभा राहिला”, असेही त्यांनी सांगितले.
“त्यामुळे आज मी जो काही आहे. त्यात सलमानचा मोठा वाटा आहे. यासाठी मी त्या नेहमीच ऋणी राहिन. हो…पण आता चेंडू मात्र त्याच्या कोर्टात आहे. भविष्यात त्याला माझ्यासोबत काम करायचे की नाही, हे त्याने ठरवायचे आहे”, असेही संजय लीला भन्साळी म्हणाले.